धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा व्हिडिओ होतोय व्हायरल;  तुम्ही पाहिला का?  

दैनिक गोमंतक
बुधवार, 21 एप्रिल 2021

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गावजत आहे. तिचे सिनेमे, गाणी तर इतकेच नाही तर तिच्या नृत्यांवर आजही प्रेक्षकांच्या काळजाचा ठोक चुकतो.

बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आजही तिच्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गावजत आहे. तिचे सिनेमे, गाणी तर इतकेच नाही तर तिच्या नृत्यांवर आजही प्रेक्षकांच्या काळजाचा ठोक चुकतो. चित्रपट सृष्टीसोबतच ती रियालिटी शोमधून पण चंहत्यांच्या संपर्कात आहे. याशिवाय ती सोशल मिडियावरदेखील अ‍ॅक्टिव्ह असते. माधुरीने तिच्या सोशल मीडियावरुन असाच एक जबरदस्त व्हिडिओ शेयर केला आहे आणि तो चंहत्यांनीही तिच्या या व्हीडिओला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. 'बाजरे दा सिट्टा' या सुपरहिट गाण्यावर नाचतानाचा व्हिडिओ माधुरीने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाऊंटवरून शेअर केला आहे.(Dhakdhak Girl Madhuri Dixit's video goes viral; Did you see)

ईदच्या मुहूर्तावर भाईजानच्या चाहत्यांना मोठं गिफ्ट

माधुरी दीक्षितच्या या व्हिडिओमधील अदा पाहून चाहते पूनह एकदा तिच्यावर फिदा झाले आहेत. यात तिच्या चेहऱ्यावरील मनमोहक अदा सर्वांचेच मन जिंकत आहेत.  माधुरीने हा व्हिडिओ "डांस के दिवाणे" या  रियलिटी शो दरम्यान व्हॅनिटी व्हॅनमध्ये बनवला आहे. यामध्ये ती शूटच्या आधी आणि नंतरच्या लुकमध्ये दिसत आहे.  माधुरीचा हा नवा अंदाज चाहतेही खूप पसंत करताना दिसत आहेत.  

अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन

चाहत्यांनी या व्हीडिओवर लाईक्स आणि कमेंट्स चा वर्षाव केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 3  लाख 32 हजाराहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.  माधुरी येत्या काही काळामध्ये अनेक नवीन प्रकल्पामधून आपल्या समोर येणार आहे.

 

संबंधित बातम्या