हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा डान्स तुफान व्हायरल
Natasha stankovic

हार्दिक पांड्याची पत्नी नताशाचा डान्स तुफान व्हायरल

हार्दिक पांड्या आयपीएल 2021 (IPL ) मध्ये मुंबई इंडियन्स (MI) संघाकडून सध्या शानदार कामगिरी करत आहे. तो प्रत्येक हंगामात मोठ मोठे फटके मारून प्रेक्षकांची माने जिंकत असतो. त्याचवेळी हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅन्कोव्हिक (Natasha Stankovic) सुद्धा सध्या सोशियल मीडिया वरती जोरदार चर्चेत आहे. नताशाचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते तिच्या पोस्टवर जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. कधी नताशाचा स्विमिंग पूलमधील व्हिडीओ वायरल होतो तर कधी समुद्र किनाऱ्यावरील स्लो मोशन व्हिडीओ. हार्दिक पांड्या बरोबरच त्याची पत्नी नताशा देखील चर्चेत असते. (Hardik Panda's wife Natasha's dance viral)

नुकताच नताशाचा एक उत्तम डान्स व्हिडिओ  सोशल मीडियावरती तुफान वायरल होत आहे. सध्या ट्रेंडिंग रील्सच्या (Trading Reels) बाबतीत आजकाल इंस्टाग्रामवर लोकांचा कल वाढत आहे. आता कलाकारही त्यातून मागे कसे राहतील? अमेरिकन रॅपर कार्डी बीच्या (Cardie Bi) रॅपवर लोक आता थिरकताना दिसत आहेत. निया शर्मा (Nia Sharma) तसेच अनेक टीव्ही आणि बॉलिवूड स्टार्सही या रॅपवर रील्स करत आहेत, तर आता हार्दिक पांड्याची पत्नी नताशाने या रॅपवर अफलातून डान्स केलेला आहे . नताशाच्या या डान्सवर चाहत्यांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. चाहत्यांसोबतच बॉलीवूड कलाकारही या डान्सचे कौतुक करत आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Nataša Stanković✨ (@natasastankovic__)

नताशा एक सर्बियन नर्तक आणि मॉडेल आहे. तिने 'सत्याग्रह' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला होता, त्यानंतर डीजे वाले बाबूं या गाण्यातून नताशाला विशेष ओळख मिळाली. तिने नच बलिये या डान्स रिऍलिटी शोमध्ये आपल्या डान्सची झलक दाखवली होती . सोशल मीडियावर नताशाची चांगली फॅन फॉलोइंग आहे. नताशा आणि हार्दिकने सन 2020 च्या सुरुवातीस लग्न केले, तर जुलैमध्ये त्यांनी मुलगा अगस्त्य याला जन्म दिला. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com