कंगनाने 'सिंगल' असल्याचा केला खुलासा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 24 एप्रिल 2021

'तू एवढी सुंदर आहेस तरी पण तू सिंगल का आहेस?’

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’.(The Kapil Sharma Show) या शोचे सूत्रसंचालन कपिल शर्मा (Kapil Sharma) करतो. या शो मधील व्हिडिओ अनेकदा सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसतात. त्यात आता बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असणारी अभिनेत्री कंगना रणावतचा (Kangna Ranaut) एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आपण सिंगल असण्याचे कारण तिने सांगितले आहे. (Kangana revealed that she is single)

‘द कपिल शर्मा शो’ मधील एक जुना व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कलर्स टिव्हीच्या अधिकृत युट्यूब आकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये कंगनाचा एक चाहता कंगनाला 'तू एवढी सुंदर आहेस तरी पण तू सिंगल का आहेस?’ असा प्रश्न विचारतो. त्यावर उत्तर देताना कंगना कपिल आणि नवज्योत सिंग सिध्दू (Navjot Singh Sidhu) यांच्याकडे पाहून बोलते. ‘याच लग्न झालं आहे आणि त्यांचपण लग्न झालं आहे.’ तर कंगनाचा चाहता तेवढ्यावरच थांबत नाही तर तो पुढे म्हणतो, मी सिंगल आहे.’ चाहत्याच्या या उत्तरावर कंगना मोठ मोठ्याने हसू लागते.

मालदिवचे फोटो शेअर करणाऱ्या बॉलिवूड कलाकारांना नवाजचा खोचक टोला

2014 मध्ये कंगना 'क्वीन' (Queen Movie) या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शोमध्ये आली होती. तेव्हाचा जुना व्हिडिओ आहे. क्वीन चित्रपटातील तिच्या अफलातून अभिनयामुळे कंगना घरा घरात पोहचली होती. या चित्रपटामध्ये कंगना सोबत अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री लीस हेडन देखील मुख्य भूमिकेत असल्याचे आपल्याला पहायला मिळाले होते.

दरम्यान, कंगना रणावत आगामी अनेक चित्रपटात दिसणार आहे. त्यातील एक तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारित ‘थलायवी’ (Thalaivi) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या निर्बंधामुळे चित्रपट प्रदर्शानाची तारिख पुढे ढकलण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘थलावयी’  हा चित्रपट तीन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यानंतर कंगना ‘तेजस’ (Tejas) आणि ‘धाकड’ (Dhakad) या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे. 
 

संबंधित बातम्या