''कंगनाच्या बुध्दीला लॉकडाऊन लागलांय''

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

डोक्यावर टांगती तलवार असताना 'चंगू मंगू गॅंग' स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत बसले आहेत,’’ असं कंगना म्हणाली. 

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत नेहमीच वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते. कंगनाने पुन्हा एकदा नेटकऱ्यांची नाराजी ओढावून घेतली आहे. महाराष्ट्र सरकारवर केलेल्या टिकेनंतर कंगनाला सोशल मिडियावर ट्रोल करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारच्या विरोधात केलेल्या ट्विटमध्ये ‘चंगू मंगू गॅंग’ असा उल्लेख केल्याने नेटकऱ्य़ांनी संताप व्यक्त केला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे शासनाने अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू लावला असून अनेक निर्बंध लादले आहेत. यावर कंगनाने ट्विट करत कंगना म्हणाली की, ‘’कोणी मला सांगू शकेल का महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन का लावण्यात येत आहे. सेमी लॉकडाऊन? बनावटी लॉकडाऊन आहे? काय सुरु इथं? असं वाटतं की कोणी कठोर निर्णय घेऊ इच्छीत नाही. डोक्यावर टांगती तलवार असताना 'चंगू मंगू गॅंग' स्वत:च्या अस्तित्वाची लढाई लढत बसले आहेत,’’ असं कंगना म्हणाली.  (Kanganas intellect is locked down)

हिज स्टोरी' वेबसीरिज प्रकरणात एकता कपूरने मागितली माफी

 

महाराष्ट्रातील सरकारवर निशाणा साधणाऱ्या कंगनाला मात्र ट्विटमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल करायला सुरुवात केली आहे. त्यातील एकजण म्हणाला, ‘’तू चंगू मंगू गॅंग’’ हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी तर वापरला नाहीस ना? त्यांचे उपकार विसरलीस’’

येत्या 23 एप्रिलला कंगनाचा ‘थलावयी’  हा सिनेमा रिलीज होणार आहे. मात्र कोरोनाच्या संकटांमुळे चित्रपटाच्य़ा प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. कंगना सध्या तिच्या आगामी ‘तेजस’ आणि ‘धाडक’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

 

संबंधित बातम्या