‘पुन्हा तर मोदीच येणार’; सरकारवरील टीकेला अनुपम खेर यांचं उत्तर

Modi will come again Anupam Khers reply to the criticism on the government
Modi will come again Anupam Khers reply to the criticism on the government

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. यातच राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडत आहेत. कोरोनाच्या कठीण काळातील गैरव्यस्थापनाला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका जेष्ठ पत्रकार शेखर गुप्ता (Shekhar Gupta) यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन केली आहे. त्यांच्या या ट्विटला बॉलिवूडमधील प्रसिध्द आणि जेष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी उत्तर दिलं असून त्यांच्या या उत्तराची चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे. ‘घाबरु नका येणार तर मोदीच’ असं उत्तर अनुपम खेर यांनी जेष्ठ पत्रकार शेखर गुप्ता यांना दिलं आहे. (Modi will come again Anupam Khers reply to the criticism on the government)

शेखर गुप्ता यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन केलेल्या ट्विटमध्ये म्हटले की, ‘’ नैसर्गिक आपत्ती, अन्नटंचाई, युध्द अशा अनेक कठीण परिस्थिती मी पाहिल्या आहेत. मात्र भारताच्या फाळणीनंतर कोरोनाचं संकट हे सर्वात मोठं आहे. भारताने अशा प्रकारचं अकार्यक्षम सरकार कधीचं यापूर्वी पाहिलं नाही. संपर्क साधण्यासाठी कोणत्याही प्रकारचं नियंत्रण कक्ष नाही. कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेतली जात नाही. हा केवळ प्रशासनाचा अभाव आहे,’’ अशा शब्दात शेखर गुप्ता यांनी निशाणा साधला होता.

 दरम्यान, अनुपम खेर यांनी शेखर गुप्ता यांना ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. ‘’आदरणीय शेखर गुप्ताजी, हे अतीचं झालं आहे. तुमच्या स्टॅंडर्डपेक्षाही. कोरोना ही एक आपत्ती आहे, संपूर्ण जगासाठी. याआधी आपण अशाप्रकारच्या महामारीचा कधीचं  सामना केला नव्हता. सरकारवर टीका करणं गरजेचं आहे. केंद्र सरकारवर टिकाटिप्पणी करा मात्र कोरोनाशी सामना करणं ही आपली सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. तसं घाबरु नका, येणार तर मोदीच,’’ अशा शब्दात अनुपम खेर यांनी उत्तर दिलं आहे.

अभिनेते अनुपम खेर अनेकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तसेच भाजपचे (BJP) समर्थन करताना दिसतात. त्याचबरोबर यापूर्वी देखील ते सोशल मिडियावरील ट्विटरच्या माध्यमातून पाठराखण करताना दिसले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com