तुर्की सिनेमात रोबोट साकारणार मुख्य भूमिका

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 जून 2021

या चित्रपटात 'एरिका' नावाची रोबोट (Robot) मुख्य भूमिका साकारणार आहे.

 

भविष्यात हॉलिवूड(Hollywood)आणि बॉलिवूड सेलिब्रिटींच्या जागी चित्रपटांमध्ये रोबोट झळकल्यास आश्चर्य वाटायला नको. कारण येणारा काळ हा तंत्रज्ञान क्षेत्रात अधिक प्रगती करणारा आहे. हॉलिवूडमध्ये यंत्रमानवाच्या आगमनाची तयारी सुरु झाली आहे. यातच आता तुर्की चित्रपटांमध्येही (Turkish movies) एका यंत्रमानवाने एन्ट्री केली आहे. तुम्हाला धक्का बसला असेल ना! होय हे प्रत्यक्षात आता घडू लागले आहे. आजपर्यंत चित्रपटांमध्ये वि एफ एस्क (VF Esk) तंत्रज्ञानाच्या साथीने युध्द परिस्थिती किंवा रोबोट चित्रीत केले जात होते. आता रोबोटचं प्रत्यक्षात सिनेमामध्ये अभिनय करणार आहेत. हॉलिवूडमध्ये निर्माते अनौश सादेघ(Anaush Sadegh) आणि सॅम खोझे (Sam Khoze) अशा एका चित्रपटाची निर्मिती करत असून या चित्रपटाचे नाव 'बी' असे आहे. या चित्रपटात 'एरिका' नावाची रोबोट (Robot) मुख्य भूमिका साकारणार आहे.

तुर्की सिनेमामध्ये हॉलिवूडनंतर 'आयपेरा' (Ipera)  ही रोबोट आपल्या अभिनयाचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. 'डिजिटल ह्यूमन' (Digital Human)  असे या चित्रपटामध्ये नाव असून या सिनेमात आयपेरा मुख्य भूमिका साकारणार आहे. आयपेराने या चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. तसेच तिने मुलाखतीही देण्यास सुरुवात केली आहे. पटकथा लेखक आणि निर्माते बिरोल गुव्हेन (Birol Guven) या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. रोबोट माणसांना एक साथ आणणाऱ्या या चित्रपटाचे चित्रीकरण सप्टेंबर महिन्यामध्ये सुरु होणार आहे. तर हा चित्रपट 2022 प्रदर्शित होणार आहे.

3-Idiotsच्या त्या सिन साठी आम्ही खरच ड्रिंक केली होती; शर्मन जोशीने सांगितला...

आयपेराने एका मुलाखतीमध्ये ती हा चित्रपट करण्यासाठी ती खूप उत्सुक असल्याचे म्हटले आहे. रोबोट अभिनेत्री या संकल्पनेबाबत सांगताना ती म्हणते, ''मला डिजिटल अभिनेता म्हणून ओळखण्यात यावे अशी माझी इच्छा आहे. मात्र मला माहितेय लोकांना अभिनेता शब्द उच्चारण्याची सवय असते. त्यामुळे मला ते त्यांच्या सवयीप्रमाणे रोबोटच म्हणतात. परंतु मला याचं काही वाईट वाटत नाही,'' असे आयपेरा म्हणाली.

6 जून पर्यंत इस्तंबूलमध्ये (Istanbul) 'कंटेम्पररी इस्तंबूल' (Contemporary Istanbul) या महोत्सवाचे आयोजन करण्यात आला आहे. या महोत्सवातील प्लग इन न्यू मिडिया सेक्शन मध्ये ती भाग घेणार आहे. त्यामुळे अनेकांना तिच्याशी संवाद साधण्याची संधी मिळेल.

Arrested: करण मेहरा आणि निशा रावल का,'ये रिश्ता क्या कहलाता है'?

दरम्यान, पटकथा लेखक आणि निर्माते बिरोल गुव्हेन म्हणाले, येणाऱ्या काळात मोठ्या पडद्यावर रोबोट झळकताना दिसतील. एवढचं नाही तर मला ''येत्या काळात घडणाऱ्या बदलांचा प्रणेता व्हायचं आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये रोबोट निर्माते तसेच रोबोट लेखक उदयाला येतील, असं मला वाटतं''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ay Pera (@aypera_official)

निर्माते बिरोल गुव्हेन यांच्या वक्तव्यावरुन आता यंत्र मानवच येणाऱ्या काळात अभिनय क्षेत्रामध्ये आपला जम बसवतो की काय असं चित्र निर्माण झालं आहे.

संबंधित बातम्या