रामायणातील सीता सरकारवर नाराज; घरातच साजरा करावा लागला वाढदिवस

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 18 एप्रिल 2021

देबिनाला गतवर्षाप्रमाणे घरातच वाढदिवस साजरा करावा लागत आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) रामायण मालिकेतून घराघरात पोहचली. देबिना आज 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या चाहत्यांनी सोशल मिडियावरुन तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र देबिना वाढदिवस असून खूश नाही. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देबिनाने सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.

देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. ते पाहता सरकारने अनेक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे देबिनाला गतवर्षाप्रमाणे घरातच वाढदिवस साजरा करावा लागत आहे. ‘’लॉकडाऊनमुळे मला माझा वाढदिवस घरातच बसून साजरा करावा लागत आहे. खरतर सरकारने घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. कारण कोरोना संसर्गाचा प्रसार वाढतोय. वाढदिवस देखील वर्षातून एकदाच येतो, परंतु गेल्या वर्षीप्रमाणे यावेळी देखील मला माझा वाढदिवस कुटुंबियांशिवाय़ साजरा करावा लागत आहेत,’’  अशा शब्दात देबिनाने आपली खंत व्यक्त केली आहे. (Sita in the Ramayana displeased with the government The birthday had to be celebrated at home)

अजय देवगण इंग्लिश शोच्या रिमेकमधून करणार 'OTT' प्लॅटफॉर्मवर पदार्पण

पुढेही देबिना म्हणाली, ‘’लॉकडाऊन संपला की, मी माझ्य़ा कुटुंबाला भेटणार आहे. त्यावेळी मी त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा वाढदिवस साजरा करणार.’’ 

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सरकारने कडक निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे. हे निर्बंध 30 एप्रिल पर्यंत असणार आहेत. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेच्य़ा लोकांनाचं प्रवास करता येणार आहे. गरज नसताना बाहेर पडणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.

 

 

संबंधित बातम्या