शूटिंग चॅम्पीयनशिपमध्ये साउथच्या या सुपरस्टारला 4 सुवर्णपदके

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 8 मार्च 2021

अजित फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार रेसिंगपासून ते लांब पल्ल्याच्या सायकलिंग पर्यंत  या अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना प्रभावीत केले आहे.

दक्षिण सुपरस्टार थाला अजितने आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावले आहे. तो वारंवार आपल्या चाहत्यांना आश्चर्यचकित करत असतो. अजित फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार रेसिंगपासून ते लांब पल्ल्याच्या सायकलिंग पर्यंत  या अभिनेत्याने आपल्या चाहत्यांना प्रभावीत केले आहे. आता अजितने पुन्हा एक चमत्कार केला आहे. यावेळी या अभिनेत्याने शूटिंग स्पर्धेत 4 सुवर्ण पदके आणि दोन रौप्य पदके जिंकली आहेत.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून शूटिंगमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल या अभिनेत्याला सुवर्णपदक दिले जात आहे. हा व्हिडिओ तामिळनाडू राज्य नेमबाजी स्पर्धेचा आहे ज्यात अजितने केवळ सहभागच घेतला नाही तर त्याने आपल्या शानदार खेळामधून बरीच पदकेही जिंकली आहेत. यावेळी अभिनेत्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ही पदके मिळवून अजितला खूप आनंद झाला आहे. जिथे अभिनेत्याचे चाहतेही त्याच्या विजयाचा उत्सव साजरा करत आहेत.

आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रकाश राज म्हणाले, महिला सशक्तीकरण म्हणजे... 

नेमबाजीत अजिंक्यपद जिंकण्यापूर्वी या अभिनेत्याला प्रोफेशनल रेसर म्हणूनही ओळख मिळाली आहे. त्याने अनेक कार रेसिंग स्पर्धेत भाग घेतला आहे.  अशातच अजितने नेमबाजी स्पर्धेत उत्कृष्ट कामगीरी बजावली आहे, अजितचे अनेक रूप पाहिल्यानंतर हा अभिनेता रेसर आहे की नेमबाज आहे हे त्याच्या चाहत्यांना समजणे कठीणच.

 

संबंधित बातम्या