दक्षिणात्य कॉमेडियन विवेक काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 एप्रिल 2021

तमिळ अभिनेते आणि कॉमेडियन विवेक यांचं चेन्नईमध्ये निधन झालं आहे.

तमिळ अभिनेते आणि कॉमेडियन विवेक यांचं चेन्नईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 16 एप्रिलला विवेक यांना ह्रदय विकाराचा झटका आल्यानंतर त्यांना चेन्नईमधील एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ICU मध्ये त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. आज सकाळी 4 च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

अभिनेते विवेक यांनी 15 एप्रिलला कोरोना लसीचा डोस घेतला होता. कोरोना लस घेतल्याची माहिती त्यांनी सोशल मिडियावरुन दिली होती. लस घेण्यासाठी त्यांनी सरकारी रुग्णालयाची निवड केली होती. त्याचबरोबर सरकारी रुग्णालयामध्ये कोरोना लस घेण्याचे कारण देखील त्यांनी सांगितले होते, ‘’कोविड लस सुरक्षित आहे. आपण लस घेतली आहे म्हणून आपण आजारी होणार असं कदापि समजू नका. आपल्याला काळजी घ्यावीच लागेल. लस घेतल्यामुळे धोका कमी झाला आहे हे मात्र निश्चित,’’ असं माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले होते. (Southern comedian Vivek behind the curtain of time Mourning on Cineworld)

'दोस्ताना 2' च्या सेटवरून 'या' अभिनेत्याची हकालपट्टी

विवेक यांच्या निधनाच्या बातमीनंतर तामिळ सिनेसृष्टीतील अनेकांनी सोशल मिडियावरुन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एडापड्डी के पलानीस्वामी यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत शोक व्यक्त केला आहे.

विवेक यांनी अनेक तामिळ सिनेमामंध्ये अभिनय केला आहे. ते उत्तम कॉमेडियन होते. रजनिकांत, कमल हसन, अजित, विजय, माधवन यांसारख्या बड्या कलांकारासोबत त्यांनी काम केले आहे. सिनेमातील त्यांच्या योगदानासाठी त्यांनी सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात करण्यात आले होते.

 

संबंधित बातम्या