सनी लिओनी प्रेक्षकांना भेटणार अ‍ॅक्शन अवतारात

दैनिक गोमन्तक
बुधवार, 23 डिसेंबर 2020

चित्रपट निर्माते विक्रम भट्टने सनी लिओनी या अभिनेत्री सोबत  ‘अनामिका’ या पुढील सिरीजचे शूटिंग सुरू केले आहे.

मुंबई: चित्रपट निर्माते विक्रम भट्टने सनी लिओनी या अभिनेत्री सोबत  ‘अनामिका’ या पुढील सिरीजचे शूटिंग सुरू केले आहे.

“लॉकडाऊनमुळे शूटिंगची प्रक्रिया काही काळ थांबली होती. पण फिल्म इंडस्ट्री कधीच काम करणे थांबवत नाही. त्यामुळे आम्हाला जिथे काम करायला आवडतं तिथे परत आलो आहोत” असे विक्रम भट्ट म्हणाले. “आम्ही नुकतीच सनी लिओनबरोबर शूटिंग सुरू केली आहे आणि ही एक चांगली आणि एक रोमांचक सुरुवात देखील आहे. सनीला बंदुकांसह मार्शल आर्ट करताना पाहण्याचा प्रेक्षकांना आनंद होईल. ही ऍक्शन सिरिज एक थरारक प्रोजेक्ट ठरणार आहे.” असे भट्ट म्हणाले

अनामिका ही 10 एपीसोड्स चा सिरिज असणार आहे. सनी लिऑन यापूर्वी कधीही दिसली नव्हती अशा अ‍ॅक्शन अवतारात प्रेक्षकांसमोर येणार आहे. या मालिकेचे शूटिंग मुंबईत होणार असून त्याचे पहिलं शेड्यूल या वर्षाच्या अखेरीस संपेल.

विक्रम भट्ट यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित या सिरिजची निर्माता विक्रम भट्टची मुलगी कृष्णा भट्ट आहे. ही सिरिज एमएक्स प्लेयरवर प्रदर्शित होणार आहे.

आणखी वाचा:

भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलची धनश्री वर्मासोबत नव्या इनिंगला सुरुवात -

.

 

संबंधित बातम्या