तारक मेहताची रसगुल्ला खाण्याची इच्छा होणार पूर्ण

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 25 जानेवारी 2021

टेलिव्हीजन जगातला सर्वात प्रसिद्ध शो तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेच्या आगामी भाग खूप मजेशीर ठरणार आहे. आता या मालिकेमध्ये अखेर तारक मेहताची रसगुल्ला खाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे.

नवी दिल्ली: तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेत अनेक गमतीशीर प्रसंग नेहमीच घडत असतात. टेलिव्हीजन जगातला सर्वात प्रसिद्ध शो तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेच्या आगामी भाग खूप मजेशीर ठरणार आहे. 

आता या मालिकेमध्ये अखेर तारक मेहताची रसगुल्ला खाण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. मालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रेक्षकांनी या मालिकेच्या कथेवर निर्णय घेतला आहे. यापूर्वी तारक मेहता रसगुल्ले खाण्यावरून त्याची पत्नी अंजलीशी भांडला होता; पण अखेर तारक मेहतानी रसगुल्ला खावा की नाही, ही कोंडी सोडवण्यासाठी या कार्यक्रमात प्रेक्षकांकडून सूचना घेण्यात आल्या आहे. बहुतांश प्रेक्षकांनी या वेळी तारकच्या बाजूने मतदान केले आहे. 

भारत-बांगला बंधुत्वाचे नाते; सुरक्षित गोव्याचा संदेश देत इफ्फीची सांगता -

संबंधित बातम्या

Tags