नेहा कक्करच्या गायनावर चिडले अनु मलिक; व्हिडिओ होतोय व्हायरल

दैनिक गोमंतक
सोमवार, 12 एप्रिल 2021

नेहाचा कक्कर एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीमध्ये नेहा इंडियन आयडॉलच्या सेटवर गाणे गात असताना गाणे ऐकल्यानंतर परीक्षक अनु मलिक यांनी नेहावर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळते आहे.

दिल्ली: बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर यांनी आपल्या गायनाने लोकांची मने जिंकण्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. नेहा कक्कर  यांच्या गाण्यांना चित्रपटांबरोबरच  यूट्यूबवर देखील मोठा चाहता वर्ग असल्याचे पाहायला मिळते. सध्या नेहाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीमध्ये नेहा इंडियन आयडॉलच्या सेटवर गाणे गात असताना गाणे ऐकल्यानंतर परीक्षक अनु मलिक यांनी नेहावर नाराजी व्यक्त केल्याचे पाहायला मिळते आहे. (Throwback Video of Neha Kakkar In Indian Idol)

नेहा कक्कर यांचा हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांकडून पहिला गेला असल्याचे दिसते आहे.  तसेच सोशल मीडियावरून या व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असल्याचे पाहायला मिळते आहे.  व्हिडिओमध्ये नेहा कक्कर तिच्या सहकारी स्पर्धकाबरोबर गाणे गात असते, त्यावेळी व्हिडिओमध्ये फराह खान, अनु मलिक आणि सोनू निगम हे परीक्षांच्या भूमिकेत आहेत. नेहा कक्कर यांनी गायन संपवताच अनु मलिक (Anu Malik) रागाने "तुझा आवाज ऐकल्यावर मला माझ्या तोंडावर चापट मारून घ्यावी वाटते आहे, तुला काय झाले आहे ..." अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. सध्या व्हायरल होत असलेला हा व्हडिओ  नेहा कक्कर गाण्याच्या जगात पाऊल ठेवण्यापूर्वीचा असून इंडियन आयडॉल या कार्यक्रमाचा एक भाग आहे.  

'वाकिल साब' ला झालेल्या गर्दीमुळे थेटरला ठोकले टाळे

त्यावेळी नेहा कक्करला (Neha Kakkar) इंडियन आयडॉल (Indian Idol) शोमधून काढून टाकण्यात आले होते आणि तिला हा शो तिला जिंकता ला नव्हता, मात्र आज नेहा कक्कर ही भारतातील प्रसिद्ध गायीकांपैकी (Singer) एक आहे. विशेष म्हणजे इंडियन आयडॉलमध्ये परीक्षकाच्या  भूमिकेत आहे. 

संबंधित बातम्या