'या' चिमुरड्या संगीत शिक्षकाचा व्हिडिओ बघून शंकर महादेवनही अवाक्; व्हिडिओ व्हायरल

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 22 फेब्रुवारी 2021

एका चिमुरड्या मुलाचा व्हिडीओ शंकर महादेवन यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा एका मुलीला गाणं शिकवताना दिसत आहे.

मुंबई: सुप्रसिद्ध गायक आणि संगीतकार आणि संगित दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे  शंकर महादेवन सोशल मीडियावर नेहमीच अ‌ॅक्टिव्ह असतात. ते गाण्यांचे, गायकांचे नवनवीन व्हिडीओ आपल्या सोशल अकांऊटवर शेअर करत असतात. दरम्यान अशाच एका चिमुरड्या मुलाचा व्हिडीओ शंकर महादेवन यांनी इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा एका मुलीला गाणं शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर प्रचंड व्हायरल झाला आहे. या मुलाचा आवाज, त्याची शिकण्याची पद्धत आणि सुरांबद्दलची त्याची समज बघून खुद्द शंकर महादेवन अवाक झाले.

शंकर महादेवन यांनी हा व्हिडिओ शेअर तर केलाच त्याचबरोबर त्या मुलाची भरबरून स्तूती देखील केली आहे. शब्दात महादेवन यांनी चिरमुरड्या शिक्षकाचे मनभरून कौतूक केले आहे. “मी आतापर्यत पाहिलेला हा सर्वात भारी, गोड आवाजाचा संगीत शिक्षक आहे. त्याचा आवाज नैसर्गिक देण आहे. जणु काही जन्मजात त्याला परमेश्वराकडून मिळालेली ही भेटच आहे. गाणं शिकवताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह बघा. त्याचा उत्साह बघून समोरची चिमुरडी देखील गाणं शिकण्याचा आनंद घेत आहे,” असे कॅप्शन त्यांनी आपल्या पोस्टला दिले आहे.

धकधक गर्ल च्या स्माइलवर पाकिस्तानी फैन फिदा

त्याचबरोबर शंकर महादेवन यांनी या चिरमुरड्या शिक्षकाला भेटण्याची इच्छा देखील व्यक्त केली आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची आद्याप माहिती मिळू शकली नाही. व्हिडीओच्या फुटेजवरून हा चिमुकला सामान्य कुटूंबातील असावा असा अंदाज आहे. या व्हिडीओला 3 तासात 90 हजारहून अधिक लोकांनी पाहिले आहे. अनेक नेटकऱ्यांनी तर या मुलाला ‘छोटा शंकर महादेवन’ तर काहींनी ‘भविष्यातील शंकर महादेवन’ असे म्हटले आहे.

 

संबंधित बातम्या