एमपीटी व अग्‍निशमन दलाची मुरगाव बंदरात मॉकड्रील

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

मुरगाव बंदरात सराव चाचणी
दोन डमी दहशतवाद्यांना पकडण्‍यात यश : एमपीटी व अग्‍निशमन दलाची संयुक्त कामगिरी

सराव चाचणी मोहिमेंतर्गत अमोनिया टाकीवर पाण्याचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करणारे एमपीटी अग्‍निशमन दलाचे कर्मचारी.

 

दाबोळी : आणीबाणी प्रसंगी सरकारच्या विविध एजन्सीची क्षमता व समन्वय पडताळून पाहण्यासाठी मुरगांव बंदरात सराव चाचणी प्रात्‍यक्षिकाचे (मॉकड्रील) आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या प्रसंगी विविध एजन्सीने आपली क्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला. याप्रसंगी दोन डमी दहशतवाद्यांना पकडण्यात त्यांना यश आले.

त्या दहशतवाद्यांकडे असलेल्या स्फोटकांचा शोध घेण्यास पोलिस श्‍वान पथकाने, तर स्फोटकांची विल्हेवाट लावण्यासाठी बॉम्‍ब निकामी पथकाने महत्त्‍वाची कामगिरी केली.

'मुरगाव बंदरावर दहशतवाद्यांनी हल्ला करून बंदर परिसरामध्ये असलेल्या अमोनिया टाकीचे नुकसान केले' या संकल्पनेवर सदर सराव चाचणी घेण्यात आली. एमपीटीमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे ही चाचणी घेण्यात आली. यामध्ये कोस्टल पोलिस, बोगदा पोलिस, दहशतवादी विरोधी पथक, बॉम्‍ब निकामी करणारे पथक, श्‍वान पथक, एमपीटी, इस्पितळाचे कर्मचारी, अग्‍निशमन दल सहभागी झाले होते.

 

 

गोव्याचे दुध आजपासून तापले

संबंधित बातम्या