हे कर्मचारी झाले सेवेत कायमस्वरूपी

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

७५ कामगारांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य !
महापालिकेच्या सेवेत झाले कायस्वरुपी : उर्वरितांचा प्रश्‍नही लवकरच निकालात

महापालिकेत ३१० कर्मचारी कंत्राटीपद्धीने काम करीत असून, त्यांचा करार दर तीन वर्षांनी वाढविण्यात येत आहे. २००१ पासून सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायस्वरुपी सेवेत घेण्यात आले आहे. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या काळात कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याचा निर्णय झाला होता.

पणजी : महापालिकेतील रिक्त असलेल्या ७५ जागांवर कंत्राटीपद्धतीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्यात आले आहे. आज सकाळी महसूल मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या उपस्थितीत कामगार आणि रोजगार आयुक्तांच्या कार्यालयात सह्या करण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षे सेवा करणाऱ्या कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे.

त्यात महापालिका या कर्मचाऱ्यांच्या वेतनाची रक्कम ६० टक्के आणि सरकार ४० टक्के भरणार होती. परंतु पर्रीकर आजारी पडल्याने हा प्रश्‍न प्रलंबित राहिला, कामगार आणि रोजगार मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याचबरोबर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या कर्मचाऱ्यांच्या प्रश्‍नाची दखल घेत त्यास परवानगी दिली. याविषयी महापौर मडकईकर म्हणाले की, आपल्या कार्यकाळात हा एक चांगली घटना घडल्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे सफाई कर्मचारी अनेक वर्ष काम करतात, त्यांना कायमस्वरुपी झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आपण जवळून अनुभवला असून, आमदार बाबूश मोन्सेरात आणि मंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्याबरोबर मुख्यमंत्री सावंत यांनाही याबद्दल आपण धन्यवाद देतो.

७५ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केल्याची माहिती महापालिकेत मिळताच अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. शिवाय अनेकांनी महापौर आणि आयुक्तांचे धन्यवादही मानले. अनेक वर्षांपासून हा प्रश्‍न रेंगाळत असल्याने महापालिकेच्या कामगार संघटनेच्या प्रत्येक बैठकीत कायमस्वरूपी करण्याचा विषय अजेंड्यावर येत होता. उर्वरित कर्मचाऱ्यांचा तीन वर्षांचा कार्यकाळही वाढविण्यात आला असला तरी काही महिन्यांत त्यांनाही कायमस्वरूपी करण्याचा विचार सरकारचा असल्याचे मंत्री जेनिफर मोन्सेरात यांनी ‘गोमन्तक'ला सांगितले.

जलस्रोत खाते असे ठेवणार लक्ष

कायमस्वरुपी झालेले कर्मचारी
सफाई कामगार ६६
पर्यवेक्षक ०८
चालक ०१
एकूण ७५

संबंधित बातम्या