चालकाविना मुख्याधिकाऱ्यांनाच त्यांची अधिकृत कार चालवावी लागते

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

मुरगाव: मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासाठी अधिकृत कारचालक आहेत, परंतु त्यांचा वापर न करताच मुरगाव पालिकेत मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर हे स्वतःच आपली अधिकृत कार चालवित असल्याचे आढळून आले आहे. बहुतेक वेळी पणजी, पर्वरी भागात श्री.शंखवाळकर हे पालिकेची कार चालवित असताना दृष्टीस पडत आहे.

मुख्याधिकाऱ्यांची कार चालविण्यासाठी पालिकेने अधिकृत चालक नेमलेला आहे. पण त्याचा वापर मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर करीत नाही. स्वतःच ते पालिकेची कार चालवित आहेत. त्यामुळे मुरगावात श्री.शंखवाळकर नसले तरी त्यांच्या ताब्यात ही कार नेहमीच असते.या कारवर किती इंधन खर्च केले जाते त्याबद्दलही प्रश्नचिन्ह आहे.

हल्लीच मडगाव पालिकेचे मावळते मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांच्या पालिकेचे अधिकृत वाहन वापरण्याचा प्रश्न ऐरणीवर असतानाच आता मुरगावचे मुख्याधिकारी श्री.शंखवाळकर अधिकृत कार चालकाला डावलून पालिकेची कार आपल्या ताब्यात ठेवून मनमानेलपणे त्या कारचा वापर करीत असल्याची चर्चा वास्कोत रंगली आहे.

दरम्यान, याविषयी नगराध्यक्ष नंदादीप राऊत यांना विचारले असता, अधिकृत चालक घेऊन मुख्याधिकाऱ्यांनी कारचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सडा कचरा प्रकल्प बनला पांढरा हत्ती

संबंधित बातम्या