पर्यटन खात्याच्या अनास्थेमुळे पर्यटक संख्या रोडावली : साटेलकर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

तेरेखोल:सरकारची चुकीची धोरणे व पर्यटन खात्याची अनास्था पर्यटक रोडावण्यास कारण ठरली आहे.पेडणे तालुक्याच्या किनारी भागातील व्यावसायिकांना फटका बसला आहे.व्यवसायात कधी नव्हे एवढी मंदी जाणवत आहे. किनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना कोणत्याच सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटक येथील किनाऱ्यांकडे पाठ फिरवत आहेत.याला सरकारचे पर्यटन खातेच पूर्ण जबाबदार असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष राजेंद्र साटेलकर यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केला आहे.

सरकार मांद्रे समुद्र किनारपट्टीवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सोयी सुविधा पुरवण्यास कमी पडले आहे. पर्यटन खात्याची अनास्था यामुळे त्याचा फटका येथील स्थानिक शॅक व्यावसायिकांना बसत आहे.पर्यटन खात्याकडून कोणत्याच सुविधा उपलब्ध केल्या जात नाहीत.मात्र व्यावसायिकांना अनेक जाचक अटींचा सामना करावा लागत आहे.मांद्रे मतदार संघांतील विकासकामांच्या बाबतीतही सरकारची उदासिनता दिसून येत आहे. येथील बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टीने कोणतेच प्रयत्न होत नाहीत.मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार व राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तुये येथे नवीन महत्त्‍वाकांक्षी हॉस्पिटलची उभारणी केली.त्या प्रकल्पाची आमदार व मंत्री फक्त पाहणी करून येथील जनतेला भुलवण्याचे काम करण्यात गुंतले आहेत.हॉस्पिटल सुरू करण्याच्या बाबतीत उदासिनता, तुये इलेक्ट्रॉनिक सिटीचा पत्ताच नाही.पाणी समस्येने लोकांचे जगणे असह्य झाले आहे. वीज पुरवठा बेभरवशी, खड्डे पडलेल्या रस्त्याना केवळ डांबराचा मुलामा फासला जात आहे.वाढत्‍या महागाईमुळे लोक हैराण झाले आहेत. सरकार मात्र लोकांना बेगडी आश्वासने देऊन पोकळ घोषणाबाजीच्या कैफात भुलविण्याचे काम करीत असल्याचे श्री.साटेलकर यांनी पत्रकात म्हटले आहे.

जनमत कौल हे इतिहासातील सोनेरी पान

संबंधित बातम्या