पेन्ह दि फ्रांक ग्रामसभा

panchayat raj budget
panchayat raj budget

पर्वरी :  पेन्ह द फ्रान्स पंचायतीची ग्रामसभा विविध विषयांनी घेण्यात आली. या सभेत २०२०-२०२१ वर्षाकरिता अंदाजे चार कोटी पन्नास लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकाल्पवार चर्चा झाल्यानंतर मान्यता देण्यात आली.

ग्रामसभेला सरपंच गुरुनाथ वेर्णेकर, पंच श्याम कामत, स्वप्नील चोडणकर, शालू गुप्ता, गाब्रियाल वाझ, उपसरपंच मनिषा नाईक, सविता नाईक व सचिव बिपिन कोरगावकर उपस्थित होते. विनोद कुंभारजुवेकर यांनी अर्थसंकल्प सादर केला.

सरकारने गावातील काही जागा खासगी वन म्हणून जाहीर करण्याची अधिसूचना जरी केली आहे. त्याला ग्रामस्थांनी हरकत घेतली असून, आजच्या ग्रामसभेत त्याला विरोध दर्शविणारा ठराव मांडण्यात आला. सरकारच्या काही ग्रामपंचायतींना शहराचा दर्जा देण्याचा जो प्रस्ताव आणला आहे, त्यालाही या ग्रामसभेत
विरोध दर्शिवला आहे. कारण गावातील साधनसुविधांवर ताण येणार आहे, असे ग्रामस्थांनी मत व्यक्त
केले.

मालीम येथे मासे विक्री आणि कापणे करणाऱ्या लोकांना शिस्त लावावी. तसेच त्यांना कचरापेट्या पुरवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. बेकायदा गाडे उभारणीला ग्रामस्थांनी कठोर विरोध केला. जे लोक बेकायदा गाडे उभारतात त्यांच्यावर पंचायतीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

सरपंच गुरुनाथ वेर्णेकर आणि सचिव बिपिन कोरगावकर यांनी लोकांचे म्हणणे ऐकूण त्यांना समर्पक उत्तरे दिली. सुरवातील मागील ग्रामसभेचे इतिवृताचे वाचन झाले. सरपंच वेर्णेकर यांनी स्वागत केले. श्याम कामत यांनी आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com