मडगावात प्रवासी बसला आग

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

लोकांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

नावेली: मडगावात (बुधवारी) मडगाव पोलिस ठाण्यासमोरील जुन्या बसस्थानकावर संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेलेल्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागल्याने आजूबाजुच्या लोकांनी त्वरीत प्रसंगावधान राखून आग विझवली.लोकांनी या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला.

ही प्रवासी बस इंधन भरण्यासाठी एका पेट्रोलपंपावर थांबली होती. त्याचवेळी अचानक बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला व आग पेटली. घटना स्थळावर जमलेल्या लोकांनी पाण्याचा वापर करून त्वरीत आगीवर नियंत्रण मिळवले. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

आग लागल्याची घटना घडल्यावर बसचा चालकाला काय करावे हे सुचेनासे झाले.बस चालक बसमधून खाली उतरला. त्यानंतर पुन्हा बसमध्ये चढला त्यावेळी जुन्या बस स्थानकावरील अन्य बसचालक व लोकांनी ही बस बंद पडल्याने धक्का देऊन बाजूला काढली.ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी बस स्थानकावर तसेच रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात लोकांची तसेच प्रवाशांची ये-जा सुरू होती.बाजूला मोठ्या प्रमाणात दुचाकी पायलट तसेच इतर दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या बाजूला बसून फळविक्रेत्या महिला व्यवसाय करीत होत्या. घटना स्थळाच्या समोरील गाडे खुले होते. बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात खासगी प्रवासी बसी तसेच इतर काही खासगी वाहने पार्क केलेली होती. दैव बलवत्तार म्हणून घटना टळली, अशी प्रतिक्रीया घटना स्थळी असलेल्या लोकांनी व्यक्त केली. भर लोकवस्तीत ही घटना घडली.सुरवातीला पेट्रोलपंपावर इधन भरण्यासाठी बसला लागलेल्या आगीमुळे लोक भयभीत झाले होते.

 

 

 

गांधीजींची सत्य,अहिंसा आजही जगाला तारक

 

संबंधित बातम्या