जिल्हा पंचायतीच्या निम्म्या जागा लढविणार  

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पणजी:जिल्हा पंचायतीच्या निम्म्या जागा लढवणार
मगो आमदार ढवळीकर अंतिम निर्णय समितीचा असेल
मार्च महिन्यात होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत मगोतर्फे उत्तर व दक्षिण गोवा जिल्ह्यातील निम्म्या
जागा स्वबळावर लढविण्यात येणार आहे.मात्र, अंतिम निर्णय पक्षाच्या केंद्रीय समितीचा असेल.या निवडणुकीत आरक्षित मतदारसंघ पंचायत खात्याने किमान ३ फेब्रुवारीपर्यंत घोषित करावेत, असे मत मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी व्यक्त केले.जिल्हा पंचायत निवडणूक १५ मार्चला घोषित झाली आहे. त्यामुळे ८ फेब्रुवारीपर्यंत निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

त्यामुळे अनुसूचित जाती - जमाती तसेच इतर मागासवर्गीयांसाठी कोणते मतदारसंघ आहेत याची माहिती निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याच्या किमान पाच दिवस आधी निर्णय व्हायला हवा.आरक्षित मतदारसंघासाठी मगोकडे उमेदवारांचा तोटा नाही.उत्तर व दक्षिण गोव्यात प्रत्येकी निम्‍म्या मतदारसंघात उमेदवार उभे केले जाणार आहे.यामध्ये थोडासा बदल होऊ शकतो.गेल्या जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीत मगोने १५ मतदारसंघातून उमेदवार उभे केले होते व सहा जागा जिंकल्या होत्या.काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांना पाठिंबा दिला होता त्यातील ३ उमेदवार विजयी झाले होते.यावेळी पक्षाला लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहता अधिक जागा लढविण्याबाबत निर्णय सुरू आहे.लवकरच पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक होणार आहे.त्यात अंतिम निर्णय होईल. काही मतदारसंघ पक्षाने ठरविले आहेत तसेच उमेदवारांचीही चाचपणी सुरू केली आहे.या निवडणुकीत मागीलपेक्षा अधिक जागा मिळणार असा दावा ढवळकीर यांनी केला.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी तयार केलेल्या मतदार यादीचा वापर जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी केला जाणार आहे.त्यामध्ये पुरवणी मतदार यादीचाही समावेश असणार आहे.सरकारने आरक्षित मतदारसंघाबाबतचा निर्णय घेतल्यानंतर तसेच यादी मिळाल्यावर निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.प्रत्येक उमेदवाराला प्रचारासाठी ५ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा आहे.दैनंदिन खर्चाचा अहवाला उमेदवारांना राज्य निवडणूक आयोगाला द्यावा लागणार आहे असे आयोगाच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

२६ जानेवारीला मगोतर्फे म्हादई बचाव आंदोलन

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सरकारी यंत्रणा झाली सज्ज
जिल्हा पंचायतीसाठी सरकारी यंत्रणा गतिमान झाली आहे.या निवडणुकीसाठी मतदार याद्या तयार झाल्या आहेत व निर्वाचन अधिकाऱ्यांच्याही नेमणुका करण्यात आल्या आहेत.सुमारे १२०० मतदान केंद्रांची पाहणी सुरू आहे.निवडणुकीसाठीची इतर कर्मचारी नेमणूक प्रक्रिया सुरू झाली आहे.
 
संबंधित बातम्या