एक करोडपती महिला नाकात खोबरेल तेल घालून कोरोनाला पळवतेय; असा मेसेज होतोय व्हायरल

 Biocon chairperson Kiran Mazumdar Shaw protects herself from corona virus by applying coconut oil to her nose
Biocon chairperson Kiran Mazumdar Shaw protects herself from corona virus by applying coconut oil to her nose

नवी दिल्ली: FACTCHECK सध्या सोशल मीडियावर(Social Media) एक संदेश(SMS) मोठ्या प्रमाणात व्हायरल(Viral) होत आहे, त्या संदेशात असा दावा करण्यात येत आहे की, फार्मास्युटिकल कंपनी बायोकोनच्या चेअरपर्सन किरण मजूमदार शॉ(Pharmaceutical company Biocon Chairperson Kiran Majumdar Shaw) यांनी एका दिवसात चार वेळा नाकात नारळाचे तेल(Coconut oil) लावून कोरोना विषाणूंपासून स्वत:चा बचाव केला आहे. हा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवरून लिंक्डइन आणि इतर सोशल मीडियावरही शेअर केला जात आहे.( Biocon chairperson Kiran Mazumdar Shaw protects herself from corona virus by applying coconut oil to her nose)

आता या व्हायरल मेसेजवर बायोकॉनकडून प्रतिक्रिया देण्यात आली असून, त्यात हा मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले गेले आहे. आपल्या ट्वीटर हँडलवर या फॉरवर्ड मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत कंपनीने सांगितले आहे की, "फेकफॉरवर्ड अलर्ट, किरण मजुमदार शॉच्या नावावर बनावट संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर केला जात आहे, ज्यात म्हटले आहे की, त्यांनी नारळाचे तेल नाकात लावून स्वत:ला कोरोनापासून मुक्त केले आहे. हा एक बनावट संदेश आहे आणि किरणने काहीही सांगितले नाही. हा त्यांचा सल्ला नाही, कृपया तूम्ही तो फॉलो करू नका. #StayAware #StaySafe ”


कोरोनाशी संबंधित अनेक संदेश सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत, ज्यामध्ये कोरोना टाळण्यासाठी काही टिप्स विचारल्या जात आहेत. नुकत्याच झालेल्या व्हायरल मेसेजमध्ये असा दावा केला गेला आहे की पावसामुळे कोरोना थांबेल, पण त्यात काही तथ्य नाही. पीआयबी फॅक्ट चेकच्या चमूनेही याबद्दल ट्विट केले आहे की, मास्क घालून, हात धुऊन आणि सामाजिक अंतर ठेवल्यानेच कोरोना थांबेल.

याशिवाय आणखी एक संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात असा दावा केला जात आहे की जर तुम्ही 10 सेकंद आपला श्वास रोखून ठेवला तर आपण कोरोनो विषाणूच्या संसर्गापासून मुक्त होऊ शकता. पण पीआयबीनेही याला बनावट घोषित केले असून त्यावर ट्विट करुन यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे. आपल्यालाही असा संदेश मिळाल्यास, त्यावर विश्वास ठेवू नका आणि अशा बनावट संदेशापासून दुर रहा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com