चीननं भारतातील केली बत्ती गुल? अमेरिकेनं उघड केली धक्कादायक माहिती

दैनिक गोमन्तक
सोमवार, 1 मार्च 2021

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादात चीनने भारतातील वीज सुविधांना लक्ष केल्याची माहिती एका अहवालाद्वारे मिळाली आहे.

भारत आणि चीन यांच्यातील सीमावादात चीनने भारतातील वीज सुविधांना लक्ष केल्याची माहिती एका अहवालाद्वारे मिळाली आहे. मागील वर्षाच्या मे महिन्यात लडाख भागातील सीमेवरून भारत आणि चीन यांच्यात मोठा वाद उफाळला होता. आणि त्यानंतर जून महिन्याच्या मध्यात दोन्ही देशांच्या सैन्यात मोठा संघर्ष घडला होता. त्यानंतर चीन भारतातील वीज सुविधांना निशाणा बनवत असल्याची शंका एका अहवालाने व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईत झालेले विजेचे संकट हे त्याचे उदाहरण असू शकते असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

चीन अमेरिकेत पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी?

मागील वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये मुंबईत कोरोनाचा कहर चालू असताना विजेचे मोठे संकट ओढवले होते. त्यामुळे ट्रेन मधेच थांबल्या होत्या आणि काही तास हॉस्पिटल्स देखील अंधारातच राहिली होती. त्यानंतर आता चीनशी निगडित असलेल्या धोकादायक गटाने ही कारवाई केली असल्याचा अंदाज एका अहवालाने व्यक्त केला असून, याबाबतची माहिती सरकार पर्यंत पोहचविण्यात आल्याचे म्हटले आहे. चीनशी संबंधित असलेल्या RedEcho ने भारतातील वीज सुविधांना लक्ष केले असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. चीनच्या या समूहाने ऍटोमॅटिक ट्रॅफिक अनॅलिटीक्स नेटवर्क आणि तज्ञ विश्लेषकांच्या संयोजनाद्वारे हेरफार केले असल्याचे या अहवालात अधोरेखित केले आहे. 

भारत आणि चीन यांच्यात लडाखच्या गलवान भागात झालेल्या संघर्षानंतर भारतातील वीज यंत्रणेत चीनचे हॅकर्स कार्यान्वित होते असे या अहवालात म्हटले आहे. व चीनच्या हॅकर्सचा फ्लो अमेरिकेच्या रेकॉर्डेड फ्यूचरसोबत जोडला गेला होता. ही कंपनी सरकारी यंत्रणेद्वारे इंटरनेटच्या वापरावर लक्ष्य ठेवते. त्यानंतर बहुतेककरून सर्व हॅकर्स यांनी केलेला फेरफार ऍक्टिव्ह झाले नसल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे. कारण रेकॉर्डेड फ्यूचर भारतातील वीज यंत्रणेत पोहचू शकत नसल्याचे यात म्हटले आहे. तसेच त्यामुळे देशभरातील वीज वितरण प्रणालीमध्ये ठेवण्यात आलेल्या कोडचा तपशील तपासणे शक्य झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे. 

राहुल गांधींनी 9 सेकंदात 13 पुशअप मारले लोकांनी शेअर केले मिम्स, व्हिडिओ...

याशिवाय, मागील वर्षाच्या 2020 च्या सुरवातीलाच रेकॉर्डेड फ्यूचरच्या इन्स्टेक ग्रुपने चीन मधील काही समूहांनी भारतीय संघटनांमध्ये संशयास्पद कार्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. मागील वर्षी 2020 मध्ये रेकॉर्डेड फ्यूचरच्या मिडपॉईंटने AXIOMATICASYMPTOTE यात मोठी वाढ पाहायला मिळाल्याचे म्हटले आहे. व यात शॅडोपॅड आणि सर्व्हर कंट्रोलचा समावेश करण्यात आला असून, याद्वारे भारतातील वीज क्षेत्रात शिरकाव करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे.  

दरम्यान, अमेरिकेतील काही माध्यमांनी देखील यासंबंधित वृत्त दिले आहे. या माध्यमांनी चीनच्या एका हॅकर्स समूहाने भारतातील वीज यंत्रणेत शिरकाव करून मोठा फेरफार करण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. तर त्यानंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषद घेत मिळालेल्या अहवालानुसार तपास करण्याचे आदेश सायबर गुन्हे शाखेला दिले असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी देखील या अहवालात तथ्य असल्याचे म्हटले आहे.     

 

संबंधित बातम्या