COVID-19 कर्नाटकात कोरोना वैक्सीन ची मिक्सिंग?

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 मे 2021

कोविड -19 लसीचे(Covid Vaccine)  वेगवेगळे डोस देण्यात आल्याच्या चर्चे कर्नाटकचे सुरू आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीKarnataka Deputy CM) डॉ सीएन अश्वथ नारायण यांनी या बाबत स्पष्टीकरण दिले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात लसींचे(COVID-19 Vaccine)  मिस्किंग होत नाही.

बंगळुर: कोविड -19 लसीचे(Covid Vaccine)  वेगवेगळे डोस देण्यात आल्याच्या चर्चे कर्नाटकचे सुरू आहेत. कर्नाटकचे उपमुख्यमंत्रीKarnataka Deputy CM) डॉ सीएन अश्वथ नारायण यांनी या बाबत स्पष्टीकरण दिले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्यात लसींचे(COVID-19 Vaccine)  मिस्किंग होत नाही, लोकांना समान प्रकारचा लसीचा डोस दिला जात आहे. तसेच लसीचे दोन वेगवेगळे शॉट आरोग्य कर्मचार्‍यांना दिल्या जात आहे." मात्र हे सत्य नाही आणि याचा कोणताही पुरावा नाही, असे काहींचे मत आहे.(Deputy CM told Mixing of Corona vaccine not happening in Karnataka)

कर्नाटकमध्ये सध्या वाढत्या कोरोना आणि काळ्या बुरशीच्या प्रकरणांचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डॉ. के सुधाकर यांनी बुधवारी सांगितले की, काळ्या बुरशीच्या संसर्गाच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन कोविडच्या नव्या नियमांची आणि कोविड मधून दुरूस्त झालेल्यांसाठी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचं आहे, त्यामुळे आपल्याला आरोग्यासंबधीत आणखी जास्त बदल करण्याची आवश्यकता आहे.

मोदी सरकारची मोठी घोषणा! कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 67 पत्रकारांच्या कुटुंबाला मिळणार 5 लाखाची मदत 

कर्नाटकात 24 हजाराहून जास्त रूग्णसंख्या
कर्नाटकात कोविड -19 च्या  24,214 नव्या रूग्णसंख्येची आकडेवारी समोर आल्यानंतर आता कर्नाटकात कोरोना संक्रमित रूग्णसंख्या एकूण संख्या 25 लाखांच्या पार गेली आहे. त्याच वेळी, आणखी 474 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. यासंदर्भात माहिती देतांना आरोग्य विभागाने असे म्हटले आहे की कोविड संक्रमणातून बरे झालेल्या 31459 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे, ज्याची आकडेवारी नव्या रूग्णसंख्येपेक्षा जास्त आहे. 

coronavirus: गरोदर असताना कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सचा मृत्यू 

बंगळुरु शहरामध्ये सर्वात जास्त केसेस
कोरोनाच्या नवीन रूग्णसंख्येच्या वाढीमुळे बंगळुर शहरी भागात सर्वाधिक 5949 रूग्णसंख्या नोंदवली गेली आहे. दरम्यान एका दिवसात 6,643 रुग्ण संसर्गमुक्त झाले. तक संक्रमणामुळे 273 लोक मरण पावले आहेत. बुलेटिनमध्ये आरोग्य विभागाने सांगितले की 27 मे च्या संध्याकाळपर्यंत संक्रमित लोकांची संख्या 25,23,998 वर पोचली असून त्यापैकी 27,405 लोक मरण पावले आहेत. आतापर्यंत 20,94,369 रूग्ण संसर्गमुक्त झाले आहेत. तर आता कर्नाटक राज्यात 4,02,203 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सकारात्मकतेचे प्रमाण 17.59टक्के नोंदविण्यात आले होते, तर मृत्यूचे प्रमाण 1.96 टक्के होते.

संबंधित बातम्या