नक्षल काका कृपया माझ्या वडिलांना सोडा; जवानाच्या सुटकेसाठी मुलीची भावनिक हाक

नक्षल काका कृपया माझ्या वडिलांना सोडा; जवानाच्या सुटकेसाठी मुलीची भावनिक हाक
Naxal Attck

जम्मू: सीआरपीएफचे जवान राकेश्वरसिंग मनहास यांच्या घरी भावनिक क्षण होता जेव्हा त्याच्या 5 वर्षाच्या मुलीने नक्षलवाद्यांनी अपहरण केलेल्या तिच्या वडिलांना सोडण्याची विनंती केली. छत्तीसगडमध्ये हल्ल्याच्या वेळी नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या कोब्रा कमांडो राकेश्वरसिंग यांच्या 5 वर्षांची मुलगी श्रगवीने 'कृपया माझ्या वडिलांना सोडा' अशी विनंती केली आहे. शनिवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याची बातमी समजताच कमांडो राकेश्वरसिंग मनहास यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. नक्षलवाद्यांनी हल्ल्यानंतर मनहास यांचे अपहरण केले आहे. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर केलेल्या हल्ल्यात 22 सुरक्षा जवान शहीद झाले आहेत. (An emotional call to the Naxals by the daughter of the missing Rakeshwar Singh Manhas)

त्यानंतर, माध्यमांमधून आपल्याला या हल्ल्याबद्दल माहिती मिळाली आणि या कारवाई दरम्यान राकेश्वरसिंग मनहास बेपत्ता झाले असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. शिवाय, सरकार किंवा सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांपैकी कुणीही या घटनेची माहिती दिली नसल्याचे देखील त्यांनी पुढे म्हटले आहे. मनहास यांच्या मुलीव्यतिरिक्त त्यांचा 7 वर्षाचा पुतण्या आकाशही आपला काका कुठे आहे याची चौकशी करत आहे. आपले काका कोठे आहेत हे ठाऊक आहे का? असा सवाल तो सर्वांना करत असल्याचे पाहायला मिळत आहे. यानंतर, जवान राकेश्वरसिंग मनहास यांच्या अपहरणाच्या वृत्तानंतर मनहास यांचे घर नातेवाईकांनी भरलेले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

राकेश्वरसिंग मनहास यांची पत्नी मीनू यांनी सांगितले की, ''मी जम्मूमधील सीआरपीएफ मुख्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर प्रयत्न केले. यावेळी मला तुम्हाला काहीही सांगू शकत नसल्याची माहिती दिली.'' तसेच, एकदा याबाबत माहिती कळाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहचवण्यात येईल, असे मीनू यांना सांगण्यात आले. याव्यतिरिक्त, आपल्या पतीने मागील 10 वर्षांपासून देशाची सेवा केली असून आता त्यांना घरी सुखरूप घेऊन येण्याची जबाबदारी ही सरकारची असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राकेश्वरसिंग मनहास 2011 मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाले होते. आसामहून तीन महिन्यांपूर्वीच त्यांची छत्तीसगड येथे बदली झाली होती. या घटनेनंतर सीआरपीएफने आपल्या जवानांना सुरक्षित परत आणण्याचे आश्वासन दिले आहे. आणि बेपत्ता झालेल्या जवानांच्या सुरक्षित परतीसाठी केंद्र सरकारने देखील कोणतीही कसर सोडणार नसल्याचे म्हटले आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com