देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली तरी अलीगडचा कुलूप उद्योग अद्याप ‘लॉक’

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 1 डिसेंबर 2020

General देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अलीगड शहरातील प्रमुख कुलूप आणि हार्डवेअर उद्योग अजूनही ‘अनलॉक’ झाला नाही, अशी खंत स्थानिक व्यावसायिक आणि उद्योजकांनी बोलून दाखवली.

अलीगड :  देशात अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्यानंतरही अलीगड शहरातील प्रमुख कुलूप आणि हार्डवेअर उद्योग अजूनही ‘अनलॉक’ झाला नाही, अशी खंत स्थानिक व्यावसायिक आणि उद्योजकांनी बोलून दाखवली. देशात सध्या कुलूपाला फारशी मागणी नसल्याने आणि स्थानिक पुरवठादारांकडूनही कच्चा माल उपलब्ध नसल्याने कुलूप उद्योग व्यवसाय थंडावला असल्याचे तालानगरी उद्योग संघटनेचे अध्यक्ष सी. शर्मा यांनी सांगितले. 

अनलॉक सुरू झाल्यानंतर उद्योग पुन्हा सुरु झाले आहेत. मात्र अलीगडच्या कुलूप आणि हार्डवेअर उद्योगात फारशी हालचाल दिसून येत नाही. शर्मा म्हणाले, की काही राज्यांत निर्बंध कायम असल्याने स्थानिक एजंटांना ऑर्डर मिळण्यास अडचणी येत आहेत. कुलूप विक्रीबाबत विक्रेते अद्याप सांशक असल्याने ते मोठ्या प्रमाणात कच्चा माल खरेदी करण्यास फारसे उत्सुक नाहीत. त्यामुळे उद्योगावर परिणाम होत आहे. माझ्या कारखान्यात १०० कामगार असायचे आणि आता केवळ १० कामगारांवर काम केले जात आहे, असे एका व्यावसायिकाने सांगितले. 

बेळगावचे सौंदत्ती यल्लम्मा मंदिर ३१ डिसेंबरपर्यंत बंद

सरकारने बिनशर्त चर्चा करावी ; दिल्लीतील आंदोलक शेलकऱ्यांची मागणी

संबंधित बातम्या