किती दिवस राहणार कोरोनाची दुसरी लाट ?  संशोधकांनी दिले उत्तर

दैनिक गोमंतक
मंगळवार, 20 एप्रिल 2021

गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आता कोरोनाची दुसरी लाटही अधिक भयावह होत चालली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेचा ताण सतत वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2.59 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद  करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आता कोरोनाची दुसरी लाटही अधिक भयावह होत चालली आहे. दिवसेंदिवस वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेचा ताण सतत वाढत आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2.59 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद  करण्यात आली आहे. तर कोरोना संसर्गामुळे 1,761 लोकांना आपला जीव गमवावा लागला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. त्याआधी एक दिवस म्हणजे सोमवारी, 2.74 लाख रुग्ण आढळून आले होते तर 1,619 कोरोना बंधितांचा मृत्यू झाला. अशातच देशात लसीकरण मोहिमही ठप्प पडली आहे.  ही भयावह आकडेवारी पाहता देशभरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.  अशातच कोरोनाची ही दुसरी लाट कधी कमी होणार, आणि परिस्थिती पूर्ववत कधी होणार असे अनेक प्रश्न देशातील जनता विचारत आहे. याबाबत संशोधकांनी उत्तर दिले आहे.  (How long will the second wave of corona last? The researchers answered) 

राहुल गांधी यांना कोरोनाची लागण  

दक्षिण पूर्व दिल्ली पोलिसांच्या तज्ञांनी याबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट पुढील 100 दिवसांपर्यंत राहू शकते, असा अंदाज या अहवालातून वर्तवण्यात आला आहे. तसेच 70 टक्के लोकांचे लसीकरण आणि रोग प्रतिकारशक्ती ( हर्ड इम्युनिटी)  तयार होईपर्यंत अशा लाटा सुरूच राहतात असेही मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. रोग प्रतिकारशक्तीमुळे संसर्गजन्य रोगांविरूद्ध अप्रत्यक्ष संरक्षण होत असते. लसीकरणानंतर किंवा संसर्गानंतर बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात विषणूविरोधात लढण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती विकसित होत असते. समूहाच्या या सामूहिक प्रतिकारशक्तीलाच हर्ड इम्यूनिटी म्हणतात. 

आईच्या अंत्यसंस्कारानंतर काही तासातच कोरोना रुग्णांच्या सेवेत दाखल; डॉक्टर...

डॉ. निरज कौशिक यांनी पोलिसांमध्ये जनजागृती केली. यावेळी त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.  कोरोनाच्या नव्या म्युटेंट व्हायरसमध्ये लसीचा प्रभावालाही मात देण्याची क्षमता आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या लोकांनाही पुन्हा कोरोनाचा संसर्ग होण्याचे हेच कारण आहे. हा नवा म्युटेंट व्हायरस इतका संसर्गजन्य आहे की, जर एखाद्याला याचा संसर्ग झाला तर तो तो व्यक्ति कुटुंबातीक उतर सर्वच सदस्यांना संक्रमित करतो. इतकेच नव्हे तर, लहान मुळेदेखील या व्हायरसच्या विळख्यात सापडत आहेत. 

याहून चिंताजनक बाब म्हणजे,  आरटी-पीसीआर तपासणीतही हा नवा म्युटेंट व्हायरस सापडत नाही. तथापि, वास न येणे हे त्या व्यक्तीस कोरोना विषाणूची लागण होण्याचा एक मोठा संकेत आहे.  त्याचबरोबर, ही सर्व परिस्थिती पाहता, "कोरोना विषाणूची दुसरी लाट पुढील 100 दिवसांपर्यंत टिकू शकते, असा दावा करण्यात आला आहे. तसेच 70 टक्के लसीकरण आणि हर्ड इम्युनिटी प्राप्त करेपर्यंत अशा लाटा येतच राहतील. म्हणून आपले संरक्षणात्मक उपाय करणे आणि विशेषत: मास्क लावणे थांबवि नका, असे आव्हानडॉ. निरज कौशिक यांनी केले आहे.  general 

संबंधित बातम्या