COVID-19: तिसऱ्या लाटेचा लहान मुलांवर परिणाम होणार नाही; एम्सच्या संचालकांची माहिती

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

कोरोनाची दुसरी लाट  ओसरत असताना अजून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे.

कोरोनाची दुसरी लाट (Coronavirus Second Wave) ओसरत असताना अजून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आत्तापर्यंत असे म्हटले जात होते की तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होईल. परंतू, सरकारच्या म्हणण्यानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कोणताही गंभीर परिणाम मुलांवर होईल, असे आतापर्यंत असे कोणतेही चिन्ह नाही. देशातील कोरोनाच्या परीस्थितीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया (Randeep Guleria) म्हणाले की, ''कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत आम्ही पाहिले की मुलांमध्ये संसर्ग फारच कमी होता. आतापर्यंत असे दिसून आले नाही की तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होईल. असे म्हटले जात आहे की तिसऱ्या लाटेत मुलं सर्वात जास्त संक्रमित होतील, परंतु बालरोग असोसिएशनने म्हटले आहे की ''ते फॅक्टवर आधारित नाही. तिसऱ्या लाटेचा कसलाही परिणाम लहान मुलांवर होणार नाही. त्यामुळे, पालकांनी घाबरून जाऊ नये''.(The third wave will not affect young children; Information of the Director of AIIMS)

बिहार: ऐन कोरोना काळात आरोग्य केंद्राची केली गोशाळा

2 आठवड्यांत 10 लाख अ‍ॅक्टिव रुग्ण झाले कमी
दुसरीकडे, गेल्या 22 दिवसांपासून देशात कोरोनाचे रुग्ण सातत्याने कमी होत आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही सतत वाढत आहे. 8 मे रोजी देशाचा रिकव्हरी रेट 81.7 टक्के होता. आता तो 88.7 टक्के आहे. सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की 2 आठवड्यात 10 लाख अ‍ॅक्टिव रुग्ण (Corona Active Cases) कमी झाले आहेत. ते म्हणाले की, ''गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 2.22 लाख रुग्ण आढळले आहेत. मागच्या 40 दिवसातील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. जिल्हा पातळीवर देखील कोरोनाचे रुग्ण कमी होत आहेत. देशात एकूण 14.56 कोटी (प्रथम आणि द्वितीय डोस) लस 45 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली गेली आहेत. 18-44 वयोगटातील 1.06 कोटी लोकांना प्रथम डोस देण्यात आला आहे. 

रंगापेक्षा नावाने बुरशी ओळखणे चांगले
डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, ''ज्या लोकांना मधुमेह नाही आणि ज्यांना स्टिरॉइड्स दिले गेले नाहीत अशा लोकांना काळ्या बुरशीचे संक्रमण फारच कमी झालेले आहे. आम्ही तिसऱ्या बुरशीजन्य प्रकारातील रुग्ण देखील पाहत आहोत. रंगापेक्षा बुरशीला नावाने ओळखणे चांगले. शरीराच्या वेगवेगळ्या भागातील विकासामुळे बुरशीचे रंग भिन्न असू शकतात. बुरशीचे काही लक्षण कोरोनानंतर दिसतात. जर 4-12 आठवडे लक्षणे दिसून येत असतील तर त्यास ऑन गोइंग सिमप्टोमॅटिक किंवा पोस्ट-अॅक्युट कोविड सिंड्रोम म्हणतात. जर 12 आठवड्यांपेक्षा जास्त काळ लक्षणे दिसू लागली तर त्याला पोस्ट-कोविड सिंड्रोम म्हणतात.

Yellow Fungus: काळ्या आणि पांढऱ्या बुरशी नंतर आता आली "पिवळी बुरशी"

मृत्यूचे कहर सुरूच 
देशातील कोरोनाची दुसरी लाट कमकुवत झाली असली तरी मृत्यूची संख्या कमी होत नाही. मेमध्ये दररोज सरासरी 3500 मृत्यू होत आहेत. हे संपूर्ण जगाच्या तुलनेने सर्वात जास्त आहेत. जगातील फक्त दोनच देशात 3 लाखाहून अधिक लोक मरण पावले आहेत. त्यापैकी अमेरिका प्रथम आणि ब्राझील दुसर्‍या क्रमांकावर आहे. अमेरिकेत, संसर्गामुळे 6 लाख आणि ब्राझीलमध्ये 4.48 लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

 

संबंधित बातम्या