आयुष मंत्रालयाची जबाबदारी आता किरण रिजीजूंकडे

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 20 जानेवारी 2021

आयुष मंत्रालयाचा ताबा केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

पणजी : केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्याकडील आयुष मंत्रालयाचा ताबा केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. श्रीपाद नाईक हे संरक्षण राज्यमंत्रीही आहेत. आठवडाभरापूर्वी कर्नाटकातील अंकोल्याजवळ झालेल्या रस्ते अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार सुरु आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिखांचे दहावे गुरु, श्री गुरु गोविंद सिंह यांना आदरांजली

होस्कुंबी येथील भीषण अपघातातून बचावलेले केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना पहिल्यांदाच उपचार सुरू असलेल्या गोमेकॉच्या इस्पितळाबाहेर काल खुल्या हवेत फिरवण्यासाठी आणण्यात आलं होतं. देवाच्या तसेच सगळ्या लोकांच्या आशिर्वादानेच आज हा दिवस पाहिला. मी बरा होत आहे. संसर्गामुळे कोणी इस्पितळात भेटण्यास येऊ नये असं विनंतीवजा आवाहन त्यांनी केलं आहे. 

आझाद मैदानावर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात शरद पवार उपस्थित राहणार

संबंधित बातम्या