विधानसभा निवडणूक 2021: पेट्रोल पंपांवरुन पंतप्रधान मोदींच्या फोटोचे होर्डिंग्ज काढा; निवडणूक आयोगाचा आदेश

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 4 मार्च 2021

कोलकाता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021: भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी सर्व पेट्रोल पंप डीलर्स आणि इतर एजन्सींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र काढण्याचे आदेश दिले.

कोलकाता पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक 2021: भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी सर्व पेट्रोल पंप डीलर्स आणि इतर एजन्सींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले केंद्रीय योजनांचे होर्डिंग्ज त्यांच्या आवारातून 72 तासांत काढून घेण्याचे निर्देश दिले आहे. राज्य निवडणूक कार्यालयातील अधिकाऱ्याने कोलकात्यात ही माहिती दिली.

पश्चिम बंगालमधील मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) कार्यालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र अशा होर्डिंग्जमध्ये वापरणे ही आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. 26 फेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेसह आदर्श आचारसंहिता लागू  झाली आहे. आदल्या दिवशी तृणमूल कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि लोकांना सांगितले की केंद्रीय योजनांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी होर्डिंग्जमध्ये पंतप्रधानांचा फोटो वापरणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे.

राष्ट्रीय तपास संस्थांचा एवढा वापर य़ापूर्वी कधीही करण्यात आला नव्हता 

बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम असा आहे

यावेळी पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. मागील विधानसभा निवडणुका सात टप्प्यात घेण्यात आल्या होत्या.  बंगालमध्ये एकूण 8 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 27 ​​मार्च रोजी, दुसर्‍या टप्प्यातील मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. तिसरा टप्प्यातील मतदान 6 एप्रिल रोजी, चौथा टप्प्यातील मतदान 10 एप्रिल रोजी, पाचव्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिल रोजी, सहावा टप्प्यातील मतदान 22 एप्रिल रोजी, सातवा टप्प्यातील मतदान 26 एप्रिल रोजी तर अंतिम टप्प्यातील मतदान 29 एप्रिल रोजी होणार आहे.

जीडीपी घसरला आणि दाढी वाढली! पंतप्रधानांची शशी थरूरांनी उडवली खिल्ली 

 

 

संबंधित बातम्या