कामकाजाच्या पहिल्याच दिवशी बायडन यांनी केली 15 कार्यकारी आदेशांवर स्वाक्षरी

गोमंतक वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जानेवारी 2021

बायडन यांनी अमेरिकन लोकांना 100  दिवस मास्क वापरण्याचे पहिल्या कार्यकारी आदेशाद्वारे आवाहन केले आहे.

वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनिर्वाचीत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी कामकाजाच्या पहिल्याच दिवशी महत्त्वाच्या 15 कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतच्या महत्त्वाच्य़ा निर्णयात फेरबदल केला आहे.

पॅरिस हवामान करारातील अमेरिकेचा नव्याने होणारा सहभाग असेल, मुस्लिमांना अमेरिकेत केलेली प्रवासबंदी रद्द करणे, जागतिक आरोग्य संघटनेतील माघार, आणि मेक्सिको सीमेवरील भिंतीचे तात्काळ बांधकाम थांबवणे यांसारख्या कार्यकारी आदेशांचा फेरबदल केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्ष पदावरुन पायउतार होताच चीनने घेतला मोठा निर्णय -

बायडन यांनी अमेरिकन लोकांना 100  दिवस मास्क वापरण्याचे पहिल्या कार्यकारी आदेशाद्वारे आवाहन केले आहे.’’आज घेतलेल्या कार्यकारी आदेशांचा मला अभिमान आहे. आम्ही अमेरिकन नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यासाठी आजपासून केली आहे. या कार्यकारी आदेशात आम्ही केलेल्या या केवळ कृती आहेत. पण आमच्या सरकारला इतर अनेक गोष्टी करण्यासाठी कायदे करण्याची गरज आहे’’. असे बायडन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.येणाऱ्या  काळात आम्ही असे अनेक कार्यकारी आदेश आम्ही काढणार आहोत. अमेरिकेतील कोरोनाचा वाढता कहर, वांशिक समानतेचे मुद्दे, अमेरिकेतील वाढत्या हवामानविषयक समस्या याबबतच्या आदेशाने आम्ही फक्त सुरुवात केली असल्याचे बायडन यावेळी म्हणाले.

अमेरिका पुन्हा पॅरिस करारात सहभागी होणार राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारताच बायडन यांनी घेतला मोठा निर्णय -

अमेरिकेचे नवे अध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या रुपाने अमेरिकेत नव्या पर्वाची सुरुवात झाली असल्याचे सांगत अमेरिकास्थित भारतीय नागरिकांनी स्वागत केले आहे. त्याचबरोबर बायडन यांनी नव्याने फेरबदल केलेल्या कार्यकारी आदेशांबद्दल भारतीय खूश आहेत. अमेरिकेतील शाळांमध्ये 'देशभक्तीपर शिक्षणाला' प्रोत्साहन असणारा ट्रम्प प्रशासनाचा अहवाल जो बायडन यांनी रद्द केला.

संबंधित बातम्या