एलएसी'वर चीनकडून HQ9 आणि HQ22 क्षेपणास्त्र तैनात; भारतानेही मजबूत केले सैन्यबळ 

एलएसी'वर  चीनकडून HQ9 आणि HQ22 क्षेपणास्त्र तैनात; भारतानेही मजबूत केले सैन्यबळ 
india-chaina.jpg

नवी दिल्ली : पूर्व लडाखमध्ये भारत-चीन सीमेवर गेल्या एक वर्षापासून तणाव कायम असल्याचे दिसत आहे. पूर्व लडाखमध्ये कमांडर स्तरावरील चर्चेची अकरवावी फेरी होऊनही चीनच्या कुरापती चालूच आहेत.  आता चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) HQ9आणि  HQ22 यांसारखी हवेतून मारा करणारी क्षेपणास्त्र तैनात केली आहे.  हे पाहता भारतीय सैन्य दलानेही सीमेवर आपलया सैन्यात पाळत वाढविली आहे. (LAC deploys HQ9 and HQ22 missiles from China; India also strengthened its military) 

HQ9 आणि  HQ22 सारखी क्षेपणास्त्रे सज्ज  
सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) पूर्वेकडील लडाखमधील भारतीय सीमेजवळ HQ9आणि  HQ22 यासह जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रही तैनात केली आहेत. HQ9हे क्षेपणास्त्र रशियन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र एस -300 चे एक उलट रूप आहे. हे क्षेपणास्त्र सुमारे 250 किमी अंतरावरुन त्याचे लक्ष्य शोधून त्यावर आक्रमण करू शकते.

फिंगर्स  क्षेत्राजवळ तैनात आहे चीनचे सैन्य 
सूत्रांच्या माहितीनुसार, होतान आणि काश्गर हवाई क्षेत्रांमध्ये चीनने लढाऊ विमानांची संख्या कमी केली आहे. मात्र ही संख्या सातत्याने कमी जास्त होताना दिसत आहे.  ज्यामुळे चीनचा हालचालींवर संशय व्यक्त केला जातोय. गेल्या वर्षी 20 आणि 30 ऑगस्ट 2020 च्या रात्री कैलास श्रेणीतील पर्वत परिसराच्या काउंटर ऑपरेशननंतर चीनने दबावाखाली येत फिंगर्स क्षेत्र रिकामे केले  होते पण त्यांचे सैन्य अजूनही जवळच तैनात आहेत.  तर चीनचा हेतू लक्षात घेता, खबरदारी म्हणून भारतीय सैनिकही कैलास रेंजच्या टेकड्यांजवळ पूर्ण शस्त्रास्त्रांसह तैनात असून चीनच्या सर्व  हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

भारताचा चीनला इशारा 
भारत आणि चीन मध्ये अलीकडील कोर कमांडर स्तरावरील चर्चेच्या 11 व्या फेरीदरम्यान भारताने सीएनएन जंक्शन येथून गोग्रा हाइट्स, हॉट स्प्रिंग्ज, डेप्सांग आणि डेमचॉक भागातून  त्यांचे सैन्य मागे घेण्याची मागणी केली. ज्यावर चीनने  नकार दिल होता. यावर, चीन आपले सैन्य मागे घेत नाही तोवर भारतीय सैन्यदेखील या भागातून सैन्य मागे घेणार नसल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. 

भारतानेही सैन्यबळात केली वाढ  
चीनच्या नव्या कुरपटी पाहता भारताने आता लडाखच्या डोंगराळ भागात सैन्याची तैनात करण्यास सुरवात केली आहे. गेल्या वर्षी भारत आणि चीन यांच्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर एलएसी'वर दोन्ही देशांचे 50-50 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. लडाखबरोबरच भारताने हिमाचल, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचलप्रदेश या क्षेत्रांतही आपले सैन्य संसाधने बळकट करण्यास सुरूवात केली आहे. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com