'या' देशात बनतोय येशू ख्रिस्तांचा जगातील दुसऱ्या क्रमाकांचा सर्वाधिक उंच पुतळा

'या' देशात बनतोय येशू ख्रिस्तांचा जगातील दुसऱ्या क्रमाकांचा सर्वाधिक उंच पुतळा
Christ the Protector.jpg

रियो दी जेनेरियो : ब्राझीलमध्ये येशू ख्रिस्ताचा जगातील दुसऱ्या क्रमाकांचा पुतळा बांधण्यात येत आहे. ब्राझीलच्या रिओ ग्रान्डे डो सुल स्टेट एन्कॅन्टाडो मध्ये 2019 मध्येच हा पुतळा बनविण्याच्या कामाला सुरवात झाली आहे.  या पुतळ्याची उंची सुमारे 141 फूट (सुमारे 43 मीटर) आहे.  या वर्षाच्या अखेरीस हा पुतळा तयार होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  तथापि, या आठवड्यात या पुतळ्यामध्ये डोके आणि दोन्ही हात जोडण्यात आले आहेत. पुतळ्यामध्ये एक लिफ्टही बसविण्यात येणार असून शीर्षस्थानी एक निरीक्षण कक्षही तयार करण्यात येणार आहे.  जगातील सात आश्चर्यापैकी एक असलेल्या आणि ब्राझीलची ओळख असलेल्या रिओ दि जेनेरियो क्राइस्ट द रेडिमर या येशू ख्रिस्ताच्या पुतळ्यापेक्षाही हा पुतळा उंच असणार आहे. क्राइस्ट द रेडिमर या पुतळ्याची ऊंची 38 मीटर  इतकी आहे. (The world's second tallest statue of Jesus Christ is being built in this country) 

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार,  ख्रिस्ताच्या या पुतळ्याच्या एकापासून दुसऱ्या हाताच्या टोकाची लांबी सुमारे 118 फूट इतकी आहे. बाहेरील दृश्य पाहण्यासाठी पुतळ्याच्या छातीमध्ये काचेची एक खिडकीदेखील लावण्यात येणार आहे.  एक स्टील फ्रेमचाही वापर केला जाणार आहे. ज्यात 17,600 क्यूबिक फुटांपेक्षा जास्त कंक्रीट वापरण्यात येणार आहे.  ख्रिस्ताच्या पुतळ्याच्या डोक्याचे वजन सुमारे 40 टन इतके असेल, जे तयार करण्यास सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. स्थानिक धर्मगुरुने या पुतळ्याची आखणी केली आहे. 

ब्राझीलमध्ये जाणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला हा पुतळा पाहण्याची अपेक्षा असते. तर येशू ख्रिस्ताच्या नवीन पुतळ्याबद्दल बोलायचे झाल्यास नव्या पुतळ्याला  'क्राइस्ट द प्रोटेक्टर' असे नाव देण्यात आले आहे. असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ क्राइस्ट ही संस्था या पुतळ्याचे बांधकाम करत आहे. या संस्थेच्या मते, या पुतळ्याचे बांधकाम 2019 मध्ये सुरू झाले होते. दोन हात मिळून संपूर्ण पुतळ्याची रुंदी सुमारे 38 मीटर इतकी आहे. या पुतळ्याचे शिल्पकार वडील आणि मुलगा असून त्यांची नावे जेनेसिओ आणि मार्कस मौरा अशी आहेत.

ब्राझीलच्या एन्कॅन्टाडो येथे 'क्राइस्ट द प्रोटेक्टर' पुतळ्याचे बांधकाम वेगाने सुरू असून या नवीन पुतळ्याच्या निर्मितीनंतर लोकांमध्ये धार्मिक श्रद्धा तर वाढेलच, याशिवाय ब्राझीलचा पर्यटन उद्योगाताही वाढ होईल. हा पुतळा तयार करण्यासाठी सुमारे साडेतीन दशलक्ष डॉलर्स इतका खर्च लागणार आहे. लोकांकडून होणारा खर्च भागविण्यासाठी आर्थिक मदतही घेण्यात आली आहे. याशिवाय परदेशातूनही पुतळ्यासाठीही निधी देण्यात आला आहे. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com