'माद्रिदमध्ये तुफान बर्फवृष्टी'...50 वर्षातल्या उच्चांकी बर्फवृष्टीची नोंद

PTI
सोमवार, 11 जानेवारी 2021

फिलोमेना चक्रीवादळामुळे मध्य स्पेनमध्ये तीव्र बर्फवृष्टी होत आहे.  माद्रिदमध्ये सात ते आठ इंच (२० ते ३० सेंटीमीटर) इतकी बर्फवृष्टी झाली असून हे १९७१ नंतरचे उच्चांकी प्रमाण आहे. 

माद्रिद :  फिलोमेना चक्रीवादळामुळे मध्य स्पेनमध्ये तीव्र बर्फवृष्टी होत आहे.  माद्रिदमध्ये सात ते आठ इंच (२० ते ३० सेंटीमीटर) इतकी बर्फवृष्टी झाली असून हे १९७१ नंतरचे उच्चांकी प्रमाण आहे. मध्य स्पेनमधील जनजीवन बर्फवृष्टिमुळे विस्कळित झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक कोलमडली आहे. अशावेळी लस आणि अन्नपदार्थांचा पुरवठा करण्यासाठी सरकार पथके पाठवणार आहे. बर्फवृष्टीत चार नागरिक मृत्युमुखी पडले असून वाहनांमध्ये अडकलेल्या पंधराशे नागरिकांची सुटका करण्यात आली.

येत्या काही दिवसांत हवामान अत्यंत धोकादायक बनेल असा इशारा वेधशाळेने दिला आहे. किमान तापमान उणे दहा अंश सेल्सियसपर्यंत खाली जाईल असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. भुसभुशीत बर्फाचे टणक बर्फात रूपांतर होण्याची आणि वाकलेली झाडे कोसळण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. माद्रिदमदील मुख्य आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहे. सुमारे वीस हजार किलोमीटर अंतराच्या रस्त्यांलगतच्या परिसराला चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे, अशी माहिती वाहतूक मंत्री ज्योस लुईस अॅबालोस यांनी दिली. शनिवारी एका गर्भवतीला रुग्णालयात नेणे शक्य झाले नाही. तिने रुग्णवाहिकेत बाळाला जन्म दिला.
 

अधिक वाचा :

६२ प्रवाशांना घेऊन बुडालेल्या इंडोनेशियाच्या विमानाचे अवशेष सापडले

रिपब्लिकन पक्षालाही ट्रम्प नकोसे, पक्षातून हकालपट्टी करण्याबाबत एका सिनेटरचं विधान

 

संबंधित बातम्या