pulitzer prize 2021 : भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव 

pulitzer prize 2021 : भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने गौरव 
Mega.jpg

साहित्य (Literature) आणि पत्रकारितेसाठी (Journalism) दिल्या जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची (Pulitzer Prize) शुक्रवारी मोठी घोषणा करण्यात आली.  भारतीय वंशाच्या मेघा राजगोपालन (Megha Rajagopalan) यांना हा पुरस्कार मिळाला आहे. राजगोपालन यांनी जगासमोर चीनचा खरा चेहरा उघडकीस आणल्याबद्दल हा पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. राजगोपालन यांनी मांडलेल्या आहवालामधून असे दिसून आले आहे की, चीनने (China) रिएज्यूकेशन कॅम्प (Reeducation Camp) अर्थात शिबिरांमध्ये उइगुर मुस्लिम (Uighur Muslim) आणि इतर अल्पसंख्यांक गटांना तुरुंगात ठेवले. यासाठी मेघा राजगोपालन यांनी उपग्रहातून काढलेल्या फोटोंचे विश्लेषण केले होते. (pulitzer prize 2021 Journalist of Indian descent honored with Pulitzer Prize)

मेघा राजगोपालन यांना आंतरराष्ट्रीय पत्रकारिता प्रकारात मिळालेला हा पुरस्कार इंटरनेट मिडिया बझफिड न्यूजच्या दोन सहकाऱ्यांसोबत वाटून घेतला आहे. राजगोपालन आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी शिबिरामध्ये राहणाऱ्या तब्बल 24 लोकांची मुलाखत घेतली होती. तसेच या मुलाखतीमधील माहितीची सत्यता तपासण्यासाठी त्यांनी उपग्रहातून काढलेले फोटो आणि थ्रीडी सिम्युलेशनचा वापर केला होता.  हे सगळं पाहून आपल्याला धक्का बसला असून त्याची कल्पनाही करवत नाही, अशी प्रतिक्रिया मेघा राजगोपालन यांनी दिली आहे. प्रकाशनाच्या माहितीनुसार, मेघा राजगोपालन आणि त्यांचे दोन सहकारी क्रिस्टो बुशेक (Cristo Bushek) आणि एलिसन किलिंग (Alison Killing) यांनी मिळून अशा सुमारे 260 शिबिरांचा अभ्यास केला होता.

'रिएज्यूकेशन कॅम्प' च्या नावाखाली उइगुर मुस्लिमांवर हल्ले
चीनमधील शिनजियांग प्रांतात (Xinjiang province) राहत असलेल्या उइगुर मुस्लिमांवर दहशतवादाचा प्रसार केला असल्याचा आरोप करत त्यांच्यावर बंदी आणली होती. शिनजियांग प्रांतामधील चीनी अधिकाऱ्यांकडून उइगुर मुस्लिमांना चेतावणी देत, कुराण तसेच नमाज पठण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्यांसहीत सर्व धार्मिक गोष्टी सोपवल्या नाही तर ते शिक्षेस पात्र असतील असे सांगण्यात आले होते.

कझाकिस्तानामध्ये साधला संवाद
मेघा राजगोपालन यांनी यासाठी एक मोठा डेटाबेस तयार केला होता. त्यांना चीनमधील शिबिरातील लोकांची मुलाखत घेण्याची देखील इच्छा होती, यासाठी त्यांना परवानगी देण्यात आली नव्हती. त्यांनतर त्यांनी शेजारच्या कझाकिस्तानमध्ये (Kazakhstan) छावण्यांमधून पळून गेलेल्या लोकांशी भेटून संवाद साधला होता. आणि त्यासंबंधी माहिती गोळा केली होती. 

तसेच भारतीय वंशाच्या दुसऱ्या पत्रकार असणाऱ्या नील बेदी (Neil Bedi) यांनाही पत्रकारितेसाठी पुलित्झर पुरस्कार जाहीर झाला आहे. स्थानिक अहवाला प्रकारात त्यांनी लिहलेल्या वृत्तांसाठी त्यांना हा विशेष पुरस्कार मिळाला आहे. टेंपा बे टाइम्समध्ये (Tampa Bay Times) प्रकाशित झालेल्या प्लोरिडातील (Florida) सरकारी अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मुलांच्या तस्करीविषयी नील बेदी यांनी एक शोधकथा प्रसिध्द केली होती.

डार्नेला फ्रेझियरलाही पुरस्कार
अमेरिकेतील कृष्णवर्णीय जॉर्ज प्लॉइड (George Ploid) याच्या हत्येचा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या  डार्नेला फ्रेझियरलाही पुलित्झर पुरस्कार मिळाला आहे. मिनेसोटामध्ये हा धक्कादायक घटना घडली होती. त्यांनतर जगभरातील लोकांनी अमेरिकेतील हिंसाचाराविरोधात (Violence in America) निषेध व्यक्त केला होता. प्लॉइडच्या व्हिडिओची क्लिप काही क्षणातचं जगभरात व्हायरल झाली होती. त्यानंतर अमेरिकन पोलिसांनी केलेल्या कृत्यटाविषयी जगभरातून टिका झाली होती. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com