पुतिन यांची सत्तेतील पकड होणार अधिक घट्ट; नव्या कायद्यांना दिली मंजुरी

पुतिन यांची सत्तेतील पकड होणार अधिक घट्ट; नव्या कायद्यांना दिली मंजुरी
Russia President

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज सत्तेवरील आपली पकड आणखीन मजबूत केली आहे. व्लादिमीर पुतीन यांनी 6-6 वर्षांच्या दोन अतिरिक्त कालावधीसाठीच्या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे 2036 पर्यंत व्लादिमीर पुतीन हे रशियाच्या राष्ट्रपती पदावर राहू शकणार आहेत. दोन दशकांहून अधिक काळ रशियन सत्तेवर राहणाऱ्या 68 वर्षीय पुतीन यांनी आज या कायद्यावर स्वाक्षरी केली.   

व्लादिमीर पुतीन यांनी गेल्या वर्षी हा बदल घटनात्मक सुधारणा म्हणून मांडला होता आणि रशियन जनतेने जुलैमध्ये त्याच्या बाजूने मतदान केले. तर गेल्या महिन्यात खासदारांनी हे विधेयक मंजूर केले होते. या कायद्यामुळे व्लादिमीर पुतीन यांना सध्याचे आणि सलग दुसरा कार्यकाळ 2024 मध्ये संपल्यानंतर आणखी दोन राष्ट्रपती पदाच्या निवडणुका लढण्याची मुभा मिळाली आहे.  

व्लादिमीर पुतीन हे प्रथम 2000 मध्ये अध्यक्ष झाले होते. आणि यावेळेस त्यांनी चार-चार वर्षांचे दोन कार्यकाळ पूर्ण केले होते. यानंतर 2008 मध्ये दिमित्री मेदवेदेव यांनी व्लादिमीर पुतीन यांच्या स्थानी जागा घेतली होती. दिमित्री मेदवेदेव यांनीच राष्ट्रपती पदाची मुदत 6 वर्षांपर्यंत वाढविली होती. त्यानंतर 2012 मध्ये व्लादिमीर पुतीन हे पुन्हा राष्ट्रपती पदावर परतले. शिवाय 2018 मध्ये पुन्हा ते राष्ट्रपती म्हणून निवडून आले.    

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com