मडगाव पालिकेच्या निवडणूकीसाठी 115 उमेदवारांनी भरले अर्ज 

दैनिक गोमंतक
गुरुवार, 8 एप्रिल 2021

मडगाव : मडगाव पालिकेच्या 25 प्रभागांतून एकूण 115 उमेदवारांनी 131 अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.

मडगाव : मडगाव पालिकेच्या 25 प्रभागांतून एकूण 115 उमेदवारांनी 131 अर्ज भरले आहेत. अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी 28 उमेदवारांनी अर्ज दाखल केले.  9 एप्रिल रोजी अर्जांची छाननी होणार असून 10 एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मडगाव पालिका निवडणूकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांमध्ये माजी नगराध्यक्ष आर्थुर डिसिल्वा, डोरीस टेक्सेरा, पूजा नाईक, गोंझाक रिबेलो, घनश्याम शिरोडकर यांच्यासह माजी नगरसेवक रामदास हजारे, सदानंद नाईक, मनोज मसुरकर, राजू शिरोडकर, राजू नाईक, अॅंजेलिस परेरा, दामोदर शिरोडकर, दामोदर नाईक, जाॅनी क्रास्टो, लिंडन परेरा, माजी नगरसेविका बबिता नाईक, लिवरामेत बारेटो यांचा समावेश आहे. (115 candidates filed applications for Madgaon Municipal Corporation election)

गोव्यात टॅक्सीचालक संपावर, तर पर्यटक वाऱ्यावर

अर्ज भरलेले प्रभागवार उमेदवार :  प्रभाग 1 रेंझिल मास्कारेनस, गोंझाक रिबेलो, मानेल फर्नांडिस, झाहुर सय्यद, आग्नेल (फ्रान्सिस) जोआन्स, मायकल डिकॉस्टा, प्रभाग 2 कालिदास नाईक, निकलाव (जॉनी) क्रास्टो, वासूदेव विर्डीकर,  प्रभाग 3 मोहिदीन उंटवाले, सेऊला वाझ, फ्रेडी परेरा, रेश्मा सय्यद, आॅल्वीन फर्नांडिस फातिमा बारेटो,  प्रभाग 4 कार्दोझ रोड्रीग्ज,सेंड्रा वाझ, पुजा नाईक, पुष्पा विर्डीकर  प्रभाग 5 जानुरिया फुर्तादो, दिपश्री कुर्डीकर, श्वेता लोटलीकर, प्रभाग 6  सदानंद नाईक, प्रवीण नाईक, योगेश नागवेकर, विराज देसाई, रामचंद्र रेडकर. 

गोवा : कोरोना संसर्ग वाढत असताना निर्बंध रद्द करण्याचे कारण काय?

प्रभाग 7 राॅयस्टन गोम्स, मिलाग्रीन गोम्स, किस्तोद डायस, मेल्सन डायस, आर्थुर  डिसिल्वा, रुझारीयो मदेरा, प्रभाग 8 ज्योकीम बारेटो, फ्रांसिस्को मिरांडा, मिलाग्र नोरोन्हा, कामिल बारेटो , लिवरामेंत बारेटो, प्रभाग 9 महादेव (रामदास) हजारे, रवींद्र नाईक, नर्मदा कुंडईकर, मान्युअल ओलीवेरा, रोशल फर्नांडिस, आगुस्तीन मिरांडा, विंंसेंट परेरा, विदेश कुंडईकर, साईनाथ कुट्टीकर, साईप्रसाद नाईक, प्रभाग 10 वितोरीनो तावारीस, वासुदेव कुंडईकर, रजत कामत, ज्योकीम राॅड्रिग्ज, प्रभाग 11 अबदीन शेख, जया आमोणकर, राजीव रवाणे, रविंद (राजू) नाईक, अॅंजेलीस परेरा, बाबुलाल सईद, प्रभाग 12 शर्मद पै रायतुरकर, व्लेम फर्नांडिस, सगुण नाईक, स्वप्नील जुवारकर, प्रभाग 13 सीता नाईक, सुशांता कुरतरकर, स्नेहल वसकर, शुभांगी सुतार, मोनालीसा विंसेंट. डोरीस टेक्सेरा, प्रभाग 14 रोनिता आजगावकर, दिपाली जामुनी, सुलक्षा जामुनी, प्रभाग 15 इफ्तीकार शेख, महेश आमोणकर, उदय देसाई, मनोज मसुरकर, अॅथनी वाझ, प्लासिडस कुतिन्हो, फेबियन कुतिन्हो, प्रभाग 16 अनिशा नाईक, दिपाली सावळ, प्रभाग 17 देविका कारापुरकर, राधिका कारापुरकर, सिताराम गडेकर, प्रभाग 18 रोहन नाईक, पराग रायकर, घनश्याम प्रभू शिरोडकर, प्रभाग 19 मंगला हरमलकर, लता पेडणेकर, प्रभाग 20 आलिंडा राॅड्रिग्ज, पोमा केरकर, सॅंड्रा फर्नांडिस, शामिन बानू,  प्रभाग 21 सचिन सतार्डेकर, दामोदर शिरोडकर, प्रभाग 22 सुनिल नाईक, दामोदर नाईक, दामोदर वरक.

 प्रभाग 23 विवियाना कार्दोझ, निमिशा फालेरो, नादीया वाझ, प्रभाग 24 पार्वती पराडकर, रेश्मा शिरोडकर, राजू शिरोडकर, प्रतिक परब, राजेंद्र बांदेकर, सत्यन नाईक गावकर, अदिश उसगावकर, जितेंद्र नाईक, उस्मान खान, प्रितम मोराटगीकर, प्रभाग 25 बबिता नाईक, अस्मा बी, अपुर्वा तांडेल, कुलसूम शेख.

संबंधित बातम्या