फेसबुकवर तरुणीच्या नावाचा वापर करून लुबाडणाऱ्या खानापूरच्या तरुणाला अटक

An accused arrested who robbed a person for 76000 through fake facebook account
An accused arrested who robbed a person for 76000 through fake facebook account

पणजी: एका तरुणीच्या नावाने बोगस फेसबुक खाते उघडून कुडका येथील तरुणाला ७६ हजार रुपयांना  लुबाडणाऱ्या खानापूर येथील केदार हवाल या तरुणाला गोव्याच्या सायबर कक्षाच्या पोलिसांनी अटक केली. त्याने चौकशीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास सुरू आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित केदार हवाल याने कुडका येथील पत्ता नमूद करून एका मुलीच्या नावाने फेसबुकवर खाते उघडले. या फेसबुकवर कुडका येथील चंदेश सावंत हा मित्र झाला. त्यानंतर संशयिताने त्याला फेसबुकवरून वारंवार पैशांची मागणी केली व चंदेश ती पूर्ण करत गेला. ज्या मुलीच्या नावाचा वापर फेसबुकवर संशयित करत होता त्या मुलीच्या आईने सायबर कक्षाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी तपास करून संशयिताचा शोध घेण्यात आला. संशयिताने फेसबुकवर बोगस खाते उघडले होते.

त्याने पैसे लुबाडण्यासाठी कुडका येथील अनोळखी तरुणीच्या नावाचा वापर करत होता. पोलिसांनी केलेल्या तपासात संशयित हा खानापूर - कर्नाटकमध्ये राहत असल्याची माहिती मिळाली. खानापूर येथे जाऊन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून गोव्यात आणले.

आणखी वाचा:

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com