गोव्यातील बँक कर्मचाऱ्यांचा पणजीतील आझाद मैदानावर संप

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 15 मार्च 2021

दोन दिवस बँक बंद राहिल्याने बँकिंग च्या कामावर परिणाम होणार आहे. गोव्यातही या संपाचे चित्र असेच काही आहे. देशातील बँकर्स दोन दिवस संपावर आहे त्यात गोवा राज्यातही बैंक कर्मचारी पणजीतील आझाद मैदानावर जमले आहे.

पणजी: दोन बँकांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावाविरोधात सोमवारी आणि मंगळवारी म्हणजे आज आणि उद्या देशभरातील बँकर्स संपावर आहे. दोन दिवस बँक बंद राहिल्याने बँकिंग च्या कामावर परिणाम होणार आहे. गोव्यातही या संपाचे चित्र असेच काही आहे. देशातील बँकर्स दोन दिवस संपावर आहे त्यात गोवा राज्यातही बैंक कर्मचारी पणजीतील आझाद मैदानावर जमले आहे. आणि संपावर बसले आहे. गोव्यातील संपूर्ण बॅंक बद आहेत 

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन (यूएफबीयू) च्या बॅनरखाली नऊ संघटनांनी हा संप पुकारला असून, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने (एआयबीईए) सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी 10 लाख बँकर्सला या संपात सामील होण्याचे आवाहन केले आहे. 

प्रभाग राखीवतेत पुन्हा घोळ झाल्यास न्यायालयात अवमान याचिका - सरदेसाई 

स्टेट बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँकेसह अनेक सरकारी बँकांनी यापूर्वीच आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की सोमवारी आणि मंगळवारी संपामुळे त्यांच्या कार्यालयीन शाखा बंद राहणार.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यावर्षी सादर केलेल्या अर्थसंकल्पानुसार सरकारने यंदा सार्वजनिक क्षेत्रातील दोन बँक आणि एका विमा कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गोमंतकीय चित्रकार पद्मश्री लक्ष्मण पै कालवश 

संबंधित बातम्या