बर्ड फ्लू अपडेट : गोव्यातील स्थलांतरित पक्षांच्या हालचालींवर नजर ठेवणार

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

शेजारील राज्यांसह देशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यानंतर गोव्यात हिवाळ्यात आलेल्या स्थलांतरित पक्षांच्या हालचालींवर पशु संवर्धन खाते आणि वनखाते यांनी संयुक्तपणे नजर ठेवणे सुरू केले आहे.

पणजी : शेजारील राज्यांसह देशात बर्ड फ्लूचा फैलाव झाल्यानंतर गोव्यात हिवाळ्यात आलेल्या स्थलांतरित पक्षांच्या हालचालींवर पशु संवर्धन खाते आणि वनखाते यांनी संयुक्तपणे नजर ठेवणे सुरू केले आहे. पशुसंवर्धन,पशुवैद्यकिय खात्याचे संचालक संतोष देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार पक्षांमध्ये बर्ड फ्लूची लक्षणे आढळतात का हे तपासणे या पाहणीचा उद्देश आहे. या आठवड्यापासून ही पाहणी सुरू करण्यात आली आहे.

कोरोनाची कोवीशिल्ड लस गोव्यात पोहोचली 

चोडण बेटावरील डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य आणि करमळी येथी तळे या परिसरात स्थलांतरित पक्षी मोठ्या प्रमाणावर हिवाळ्यात येतात. या पक्षांमध्ये बर्ड र्फ्लूची लक्षणे आढळतात का याची पाहणी सध्या करण्यात येत आहे. गोव्यामध्ये राज्याबाहेरून कोंबड्या आणण्यास बंदी घालण्यात आलेली आहे तसा आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर जारी करण्यात आलेला आहे. गोव्यामध्ये पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने चिकनला मोठी मागणी असते सध्या पर्यटन हंगाम बाळसे धरू लागला असतानाच चिकन उपलब्ध होणार नसल्याने पर्यटक व्यवसायिक नाराज आहेत, मात्र बर्ड फ्लूचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने ही बंदी घातली आहे.

मोपच्या प्रस्तावित हरित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला तीन महिन्यांची मुदतवाढ 

संबंधित बातम्या