गोव्यातल्या 2 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांच्या मृत्युसाठी भाजपा सरकार जबाबदार...

गोव्यातल्या 2 हजारापेक्षा जास्त कोरोना रुग्णांच्या मृत्युसाठी भाजपा सरकार जबाबदार...
Sanjay barde goa.jpg

म्हापसा: गोव्यात (Goa) भाजपा सरकारच्या चुकांमुळे व कोविडची (Covid-19) परिस्थिती हाताळण्यास अपयश आल्यामुळे राज्यात 2 हजारापेक्षा जास्त कोविडमुळे बळी जाण्यास भाजपा सरकार (BJP Government) जबाबदार असल्यामुळे गोव्यातील (Goa) भाजपा सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट (Presidential reign) लावण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे  (NCP) सरचिटणीस संजय बर्डे (Sanjay Barde) यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. पत्रकार परिषदेला त्याच्या समवेत रियाज शेख व संजू तिवरेकर उपस्थित होते. (BJP government is responsible for the deaths of corona patients in Goa)

संजय बर्डे म्हणाले, कोरोनाच्या फैलावाला भाजपा सरकार जबाबदार आहे. गोव्यात पर्यटकांना प्रवेश देताना कोरोना चाचणी सक्तीची केली नाही पर्यटन व्यवसाय हा राज्याचा आर्थिक कणा जरी असला तरी राज्यातील जनतेचे आरोग्य प्रथम आहे. सरकारने दोन महिन्यापूर्वी लॉकडाऊन केले असते, तर ही परिस्थिती आली नसती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत स्वतःच्या मर्जीनुसार राज्य चालवत आहे. कोरोनाच्या कठीण प्रसंगात सर्वांना विश्‍वासात घेऊन राज्य चालवले असते तर गोव्यात आज सर्व व्यवहार व लोकांचे जीवन पूर्वपदावर आले असते. आर्थिक संकटात प्रत्येक गोमंतकीयांना आणण्याचा  विक्रम मुख्यमंत्री सावंत यांनी केला आहे.

कोरोनाच्या रुग्णांना गोमेकॉ किंवा जिल्हा इस्पितळामध्ये उपचार व्यवस्थित मिळत नाही. वैद्यकीय क्षेत्रावर कामाचा ताण वाढलेला आहे. सरकार डॉक्टर वर्गाला साधनसुविधा देण्यास  असमर्थ ठरले आहे. कोरोनाच्या नावावर  मोठा भ्रष्टाचार मुख्यमंत्री व आरोग्‍यमंत्र्यांनी केला आहे. 2 लाख रुपयाचा  व्हेटिंलेटर्स 6 लाख रुपयांना खरेदी करून 200 व्हेंटिलेटर्सवर प्रत्येकी 4 लाख रुपयाप्रमाणे भ्रष्टाचार केला आहे. औषधे खरेदीत  भ्रष्टाचार झाला आहे. प्राणवायुमुळे  शेकडो गोमंतकीय नागरिकांचे बळी गेले आहे. या प्राणवायू खरेदीतसुद्धा भ्रष्‍टाचार. प्राणवायुचा सिलिंडर सुध्दा अर्धा भरलेला घेऊन भ्रष्टाचार केला आहे असे संजय बर्डे यांनी सांगितले.

कोविडची लस गोव्यातील युवा, महिला, ज्येष्ठ नागरिक यांना प्रथम मिळाली पाहिजे. ऑनलाईन पध्दतीने लसीची नोंद करण्याची सक्ती केल्यामुळे बाहेरील राज्यातील लोक गोव्यात आपल्या हॉलिडे होममध्ये राहून लसीचा फायदा घेतात. गोव्यातील गावामध्ये इंटरनेट सेवा बंद आहे. 18 ते 44 वयोगटातील लस घेण्यासाठी पोर्टलद्वारे नोंदणी करण्याची अट असल्यामुळे गोव्यातील युवांना त्याचा फायदा मिळत नाही. खाजगी इस्पितळामध्ये पैसे भरून लस देण्याची व्यवस्था असल्यामुळे बाहेरील लोकांना त्याचा फायदा होत आहे. कोविडची लस प्रथम गोमंतकीयाना उपलब्ध करून देण्याची मागणी संजय बर्डे यांनी केली  आहे. 

राज्यात मागच्या शनिवारी चक्रीवादळ झाले. या वादळात आम्हा गोमंतकीयांना मागच्या आठ दिवसात राज्यसरकारने अंधारात ठेवले सरकारने आपत्कालीन यंत्रणा कुचकामी ठरली. अग्नशामक किंवा वीजखात्याकडे कौशल्य मनुष्यबळ नसल्याचा खुलासा मुख्यमंत्री डॉ. सावंत स्वतः करीत असल्यामुळे गोव्याची आपत्कालीन यंत्रणा अस्तितवात नसल्याचा पुरावा मिळाला. वीज मंत्री निलेश काब्राल यांनी पत्रकार परिषदेत 22 कोटी वीजखात्याला नुकसानी झाल्याचा अंदाज व्यक्त केला. त्याच दिवशी मुख्यमंत्री सावंत म्हापसा येथे सांगतात 40 कोटीची नुकसानी झाली 18 कोटी रूपयांची वाढ करून सांगितले तर दुसऱ्या दिवशी मंत्री मंडळाच्या बैठकीनंतर चक्रीवादळामुळे 146 कोटीचे नुकसान झाल्याची माहिती  मुख्यमंत्री सावंत सांगतात. सर्व मंत्र्याना खुष करण्याच्या दृष्टीकोनातून 102 रोटी रूपयांची वाढ करून लुट करण्याचा षडयंत्र रचले जात आहे. असे संजय बर्डे यांनी सांगितले.                                                                          

शैक्षणिक फी माफ करा
कोविडमुळे मागच्यावर्षी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष बुडाले. त्यावेळी शाळेच्या व्‍यवस्थापनाने फी घेतली. गणवेश खरेदी  करण्यास भाग पाडले वही पुस्तके खरेदीचा बोजा पालकावर ठेवला गरीब पालकांनी कर्ज काढून स्मार्ट फोन खरेदी केले. दरमहिन्याला इंटरनेटचे पैसे भरावे लागतात. पण शिक्षण काही होत नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना शाळेची फी माफ केली पाहिजे. तसे च मामलेदार व उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत गरीब पालकांना विद्यार्थ्यांच्या  शिक्षणासाठी 10 ते 15 हजार रुपये अनुदान देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी शिक्षणमंत्री तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com