गोव्यातील आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेला नकार 

गोव्यातील आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेला नकार 
goa pramod sawant.jpg

पणजी : मडगाव, मुरगाव, म्हापसा, केपे व सांगे पालिकांच्या निवडणुका सध्या सुरू आहे. यामुळे आचारसंहिता लागू आहे. याचा फटका आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर होणाऱ्या पत्रकार परिषदेला बसलयाचे गोवा सरकारच्या माहिती व प्रसिद्धी खात्याने मात्र मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार असा निरोप पत्रकारांना दिला होता. मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करून मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद संबोधित करण्यास नकार दिला.  मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांची माहिती पत्रकाद्वारे दिली जाईल. अशी माहिती प्रमोद सावंत यांनी दिली.  मंत्रिमंडळ बैठकीत फारसे मोठे विषय नव्हते. विकासकामांसाठी दोन-तीन भूखंडांचे हस्तांतरण आणि कोविड खर्चास कार्योत्तर मंजुरी असेच विषय होते. त्या सर्व विषयांची माहिती पत्रकाद्वारे माहिती खात्याकडून कळवली जाईल. असे प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. (CM rejects press conference over Goa code of conduct) 

दरम्यान,  काही दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण व पुनर्रचनेच्या मुद्यावरून न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे उत्तर गोव्यातील म्हापसा आणि दक्षिण गोव्यातील मडगाव, मुरगाव, सांगे व केपे या पाच पालिकांची निवडणूकीला स्थगित देण्यात आली होती.  त्यानंतर राज्यसरकारने त्या स्थगितीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.  सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाची दाखल घेत 30 एप्रिलपूर्वी पाच पालिकांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले. तथापि, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, निवडणूक आयोगाने 23 एप्रिल रोजी  निवडणुकीची तारीख निश्चित करण्याचा निर्णय घेतला. 

मडगाव, मुरगाव, म्हापसा, केपे व सांगे या पाचही पालिकांचे एकूण 93 प्रभाग असून मतदारसंख्या 185225 एवढी आहे.  या पाचही पालिकांच्या निवडणूक प्रक्रियेसाठी एकूण 124 ठिकाणी 230 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत.  तथापि, एकूण 20 प्रभागांच्या म्हापसा पालिकेत 33483 मतदार आहेत, ज्यात 16403 पुरुष व 17080 महिला आहेत.  25 प्रभागांच्या मुरगाव पालिकेत 68089 मतदार आहेत, ज्यात 34602 पुरुष व 33487 महिलांचा समावेश आहे.   25 प्रभागांच्या मडगाव पालिकेत 66413 मतदारांची संख्या आहे, ज्यात 32255 पुरुष व 34158 महिला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर  10 प्रभागांच्या सांगे पालिकेत 5343 मतदार असून  यात 2532 पुरुष व 2811 महिला आहेत.  13 प्रभागांच्या केपे पालिकेत 11897 मतदार असून  5727 पुरुष व 6170 महिला मतदार आहेत. 

डिचोली: शिरगाव पंचायतींच्या सरपंचपदाची माळ अच्युत गावकराच्या गळ्यात
 
दरम्यान,  31 मार्च ते 8 एप्रिल या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 1 पर्यंत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर 9 एप्रिल रोजी सर्व अर्जांची छाननी  केली जाणार आहे. 10 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दु. 3 वा. पर्यंत अर्ज मागे  घेण्याची मुदत दिली जाणार आहे.  तर दुपारी 3 नंतर उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाईल. 23 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाली 5 पर्यंत मतदान प्रक्रिया पार पडेल तर कोरोना रुग्णांसाठी सायंकाळी 4 ते 5 हा एक तासाचा कालावधी  राखीव ठेवण्यात आला आहे. त्यानंतर 26 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com