''गिरीश चोडणकर पक्ष कमकुवत करत आहेत'' 

दैनिक गोमन्तक
सोमवार, 29 मार्च 2021

गोव्यातील कॉंग्रेसचे लोकसभेचे खासदार फ्रान्सिस सरदिन्हा यांनी पक्षाचेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर जोरदार टीका केली.

गोव्यातील कॉंग्रेसचे लोकसभेचे खासदार फ्रान्सिस सरदिन्हा यांनी पक्षाचेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर जोरदार टीका केली. फ्रान्सिस सरदिन्हा यांनी गिरीश चोडणकर यांच्यावर पक्ष कमकुवत करत असल्याचा आरोप आज केला. इतकेच नाही तर, विधानसभा निवडणूकीपूर्वी गिरीश चोडणकर यांच्या ऐवजी पक्षाने नवीन प्रदेशाध्यक्ष निवडणे गरजेचे असल्याचे मत फ्रान्सिस सरदिन्हा यांनी व्यक्त केले. 

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कोरोना अहवाल आला...

यापूर्वी, काँग्रेस पक्ष सोडून आम आदमी पक्षात सामील झालेल्या प्रतिमा कुतिन्हो यांनी देखील प्रदेश कॉंग्रेसकडे कमकुवत नेतृत्व असल्याचे त्यांनी सांगितले होते. याशिवाय पक्षातील भांडणे आणि गटबाजी पासून दूर राहण्यासाठी आपण पक्ष सोडत असल्याचे प्रतिमा कुतिन्हो यांनी म्हटले होते. तर प्रतिमा कुतिन्हो यांनी 26 मार्च रोजी काॅंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपद व सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. व दिल्ली येथे आम आदमी पार्टीचे (आप) प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन आपमध्ये प्रवेश केला होता.     

गोव्यातील टॅक्सींमध्ये बसविले जाणार डिजिटल भाडे मीटर; मिळणार या सुविधा

त्यामुळे, आता कॉंग्रेसचे खासदार फ्रान्सिस सरदिन्हा यांनी देखील प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर टीका केली आहे. आणि त्यांनी सुद्धा काँगेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे पक्षाला कमकुवत करत असल्याचेच म्हटले आहे. 

संबंधित बातम्या