Goa: बेगमीच्या खरेदीला कोरोना अन् वादळाचे ग्रहण

goa red chilly.jpg
goa red chilly.jpg

पाळी: पाऊस (Monsoon) तोंडावर आला असून लोकांची पावसाळी बेगमी (Chilly) खरेदी करण्याची लगबग सुरू असतानाच कोरोना महामारीचा (Covid-19) उद्रेक आणि त्याच्या जोडीला वादळाचा (Cyclone) तडाखा यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील लोकांच्या खरेदीला चाप बसला आहे. तरीपण लॉकडाऊनच्या (lockdown) काळात अर्धा दिवस मुभा असल्याने लोकांची फोंड्यात खरेदीसाठी गर्दी होत आहे. बेगमीच्या वस्तूंचे दरही तसे नियंत्रणात नाही. (Corona and Cyclone affect chilly market in goa)

पावसाळा जवळ आला की शहरी भागाबरोबरच विशेषतः ग्रामीण भागात बेगमीची मोठी तयारी केली जाते. मिरची, कोथंबीर, लसूण, आमटाण तसेच घरे शाकारण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंबरोबरच प्लास्टिकची आच्छादने खरेदी करण्यासाठी दरवर्षी साधारण मे महिन्यात शहरी भागात गर्दी होते. शहरांबरोबरच गावातील बाजार भागातही ही गर्दी असते. मात्र यंदा कोरोना, त्यातच वादळीवारा आणि पावसामुळे या बेगमीवर संकट आले आहे. 

बेगमीची खरेदी करताना ग्रामीण भागातील लोकांना शहरातील बाजार भागात यावे लागते. गरीब गरजू लोकांना तर प्रवासी बसगाड्यांवर विसंबून रहावे लागत असून कोरोनामुळे आधीच बसगाड्या अर्ध्या बंद झाल्याने या लोकांच्या खरेदीवर परिणाम झाला आहे. या परिस्थितीतही मिळेल ते वाहन पकडून अथवा दुचाक्‍यांवरून ही खरेदी केली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 
फोंडा बाजार भागाबरोबरच तिस्क - उसगाव, म्हार्दोळ, शिरोडा तसेच अन्य बाजारांच्या ठिकाणी ही खरेदी केली जात आहे. दरही गेल्या वर्षीप्रमाणे नियंत्रणात नाही. त्यामुळे मिळेल त्या दराने खरेदी करावी लागत असून आधीच खिशात पैसे कमी, रोजगार नाही, त्यामुळे कशीबशी खरेदी केली गेली, अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहेत. 

प्लास्टिक 30 ते 120 रुपये मीटर!
पावसाळ्यात घरे तसेच झोपड्या शाकरण्यासाठी प्लास्टिकची मोठी गरज लागते. पावसाचे पाणी घरात शिरू नये म्हणून बरेच लोक पडवीत हे प्लास्टिक आच्छादन बांधतात. दरवर्षीप्रमाणे हे प्लास्टिक आच्छादन खरेदीसाठी फोंडा शहर तसेच लगतच्या ग्रामीण भागातील बाजारात प्लास्टिकची मोठी खरेदी सुरू आहे. प्लास्टिकचा भावही तसा कमी नाही. कमी प्रतीची प्लास्टिक 30 रुपये ते 120 रुपये मीटर या भावाने विकले जात आहे. 

कोविडमुळे लॉकडाऊन असल्याने अर्धा दिवसच खरेदीसाठी मुभा दिल्यामुळे सकाळीच प्लास्टिकची खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी दिसते.मिरची, कोथंबिरीची खरेदी जास्त पावसाळ्यात मिरची, कोथंबिर, लसूण, आमटाण तसेच अन्य बेगमी कडधान्याची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. यंदा गावठी गोमंतकीय मिरची किलो मागे 600 ते 650 या भावाने विकली गेली. काही ठिकाणी साडेपाचशे भावही लावण्यात आला होता. खानापूरची मिरची ४७० रुपये किलो भाव लावण्यात आला आहे. बेडगी मिरची 280 रुपये किलो भावाने विकण्यात येत आहे. कोथंबीर दीडशे ते 140 किलो भाव आहे. अन्य बेगमीच्या वस्तूंचे दरही तसे कमी नाहीत, तरीपण पावसाळा जवळ आल्याने ही खरेदी काहीजणांनी केली असून अजूनही सुरूच आहे.

ब्लॅक फंगस नंतर आता 'व्हाइट फंगस' चे नवे संकट
"गेल्या वर्षी कोरोनामुळे  सहा महिने हाताला काम मिळाले नाही. त्यानंतर काहींना रोजगार मिळाला, पण आता पुन्हा कोरोना दुसऱ्या लाटेमुळे घरी बसण्याची पाळी आली आहे. अशा स्थितीत जीवनावश्यक वस्तू तर आणाव्याच लागतात. परंतु आता खिशात पैसा नाही. त्यातच बेगमीचे सामान सुद्धा खरेदी करावे लागेल... त्यामुळे महागाईचे चटके अधिक बसायला लागले आहेत." अशी प्रतिक्रिया तिस्क उसगाव येथील रहिवासी जयराम जिवा गावकर यांनी दिली आहे. 

"कोविडमुळे आधीच हवालदिल झालेल्या लोकांना अजून दिलासा मिळालेला नाही. सरकार आपल्यापरीने काम करीत असले तरी विशेषतः खाणपट्ट्यातील लोकांना अजून व्यवस्थित रोजगार मिळालेला नाही. मागच्या दिवसात फक्त थोडे दिवस खनिज माल वाहतुकीचे काम मिळाले, तेपण तुटपुंजे, त्यामुळे रोजगाराची भ्रांत आहे. काय करायचे ते सूचतही नाही" अशा भावना खांडेपार येथील रहिवासी  प्रकाश सदानंद यांनी व्यक्त केल्या आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com