Covid-19 Goa: कोरोना नियंत्रणात, बायणा-वास्को मायक्रो कन्टेन्मेंट झोनमध्ये 

Covid-19 Goa: कोरोना नियंत्रणात, बायणा-वास्को मायक्रो कन्टेन्मेंट झोनमध्ये 
Covid-19 Goa

पणजी: राज्यात(Goa) कोरोना चाचणी(Covid-19 test) तपासणीचे प्रमाण वाढल्यास संसर्गाचे प्रमाण वाढत होते मात्र शुक्रवारी चोवीस तासांत 4020 चाचण्या करण्यात आल्या त्यातील 315 कोरोनाबाधित आढळून आले. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण 7.8 टक्क्यांपर्यंत खाली आहे. त्यामुळे राज्यात संसर्गाचे प्रमाण बरेच कमी झाल्याने येत्या 21जूनला राज्यातील कर्फ्यू उठण्याची शक्यता वाढली आहे. (Covid-19 Goa Corona infection in control in goa state) गेल्या चोवीस तासांत कोविड इस्पितळातील 6 जणांचा मृत्यू झाला तर 315 नवीन बाधित सापडले.  ज्या 6 जणांचा मृत्यू झाला त्यातील तिघेजण गोमेकॉ इस्पितळात, प्रत्येकी एकजणाचा दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, उत्तर गोवा जिल्हा इस्पितळ व व्हिजन इस्पितळात मृत्यू झाला.

बरे होणाऱ्यांची टक्केवारी 95.99 वर 
कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून ही टक्केवारी 95.99 वर पोहचली आहे. चोवीस तासात गृह अलगीकरणात असलेले 534 जण बरे झाले आहेत तर 34 रुग्ण कोविड इस्पितळातून बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात सक्रिय असलेल्या 3599 कोरोना संसर्गित रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण (318) फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात आहेत. एकेकाळी मडगाव क्षेत्रात सर्वाधिक रुग्ण कोरोना संसर्गबाधित होते ते आता 183 वर आले आहे. 

बायणा येथे मायक्रो कन्टेन्मेंट झोन 
वास्को येथील गेमन इंजिनियर्स कंपनीतील 20 कर्मचारी कोरोना संसर्गित सापडल्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बायणा-वास्को येथील कंपनी परिसर मायक्रो कन्टेन्मेंट झोन म्हणून घोषित केला आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग प्रमाण कमी होत असले तरी एकाच ठिकाणी सापडणाऱ्या संसर्गाच्या रुग्णांमुळे त्याचा प्रसार होऊ नये म्हणून ही सावधगिरी बाळगून निर्बंधित क्षेत्र करण्यात येत आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com