डिचोलीत मासळीच्या वादात अंड्यांना चांगले दिवस

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

घाऊक मासळी विक्रेत्यांच्या सोपो कराच्या वादामुळे मागील काही दिवसांपासून निर्माण झालेली मासळीची चणचण त्यातच वाढलेले दर यामुळे आता पुन्हा एकदा बॉयलर अंड्यांना चांगले दिवस आले आहेत.

डिचोली: घाऊक मासळी विक्रेत्यांच्या सोपो कराच्या वादामुळे मागील काही दिवसांपासून निर्माण झालेली मासळीची चणचण त्यातच वाढलेले दर यामुळे आता पुन्हा एकदा बॉयलर अंड्यांना चांगले दिवस आले आहेत. सध्या मासळीचा तुटवडा आणि महागल्याने बाजारात खवय्यांकडून अंड्यांना मोठी मागणी असल्याचे दिसून येत आहे. मागणी असल्याने अंड्यांचे दरही किंचित वाढले असले, तरी मागील वर्षीच्या तुलनेत सध्या तरी दर नियंत्रणात असल्याचे आढळून येत आहे. मात्र, अंड्यांना आलेली तेजी पाहता, अंड्यांचे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. तसे संकेतही काही विक्रेत्यांकडून मिळाले आहेत. 

सध्या घाऊक विक्रेत्यांकडे 450 रुपयांना 100 नग, तर 60 रु. डझन याप्रमाणे अंड्यांची विक्री होत आहे. ग्रामीण भागात किरकोळ विक्रेत्यांकडे मात्र 65 ते 70  रु. डझन याप्रमाणे अंडी विकण्यात येत आहेत. मासळीच्या मारामारीमुळे अंडी आणखी महागण्याची चिन्हे दिसत आहेत. 

हरमलात लाखांचे अमली पदार्थ जप्त 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात मागील वर्षी एप्रिल महिन्यात अंड्यांना भाव आला होता. त्यावेळी मासळीच्या अनुपलब्धतेमुळे बहुतेक मत्स्यप्रेमी अंड्यांवर आपल्या जिभेचे चोचले पुरवत होते. एप्रिल महिन्यात तर मध्यंतरी बाजारात अंडी 80 रुपये डझनपर्यंत पोचली होती. 

मडगाव: वेश्या व्यवसाय प्रकरणी दोघांना अटक तर तीन युवतींची सुटका 

नंतर श्रावण महिन्यात अंड्यांचे दर पूर्वपदावर आले होते. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात पुन्हा एकदा अंड्यांचे दर वाढल्यानंतर मागील दोन महिन्यात अंड्यांचे दर खाली आले होते. आता मासाळीच्या तुटवड्यामुळे मागील आठवड्यापासून अंड्यांचा भाव वाढू लागला आहे.

संबंधित बातम्या