गोंयकारांनो लस घ्या! गोव्यात 2,40,490 लसींचे डोज शिल्लक

Get vaccinated The State of Goa has 240490 vaccine doses available
Get vaccinated The State of Goa has 240490 vaccine doses available

पणजी : राज्‍यात(Goa) कोरोना(Corona) मृतांची संख्‍या वाढतच आहे. रविवारी चोवीस तासांत 68 जणांचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला. आतापर्यंत गोव्यामध्ये एका दिवसांमध्ये कोरोनामुळे सर्वांत जास्त झालेल्या मृत्यूंमध्ये(Death) ही दुसऱ्या क्रमांकाची संख्या आहे. यापूर्वी 4 मे रोजी एका दिवसामध्ये 71 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. (Get vaccinated The State of Goa has 240490 vaccine doses available)

आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार रविवारी 5 हजार 671 कोरोना चाचण्‍या घेण्‍यात आल्‍या. त्यामध्ये 2633 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्याचबरोबर 3-78 रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल दिवसभरामध्ये कोरोनावर उपचार घेणाऱ्या 67 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 1678 एवढी झाली आहे. काल दिवसभरामध्ये विविध इस्पितळांतून 175 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील बहुतांश कोरोनाबाधीत हे घरीच अलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. फक्त गंभीर कोरोना रुग्ण इस्पितळांमध्ये दाखल होतात. आज सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 31875 एवढी झाली आहे.

कोरोना बाधित बरे होण्याची टक्केवारी एका टक्क्याने वाढून 71.76 टक्के एवढी झाली आहे. आतापर्यंत 85,292 कोरोना बाधित राज्यामध्ये बरे झालेले आहेत. आज मृत्युमुखी पडलेल्‍यांतील 33 जण गोवा वैद्यकीय महाविद्यालय बांबोळी येथे व 26 दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळांमध्ये मरण पावले. इतरांनी विविध इस्पितळांमध्ये शेवटचा श्वास घेतला. गेल्या 9  दिवसांमध्ये तब्बल 496 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कालपासून राज्यामध्ये कोरोना नियंत्रणासाठी कर्फ्यू लागू झालेला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये कोरोना बाधितांची संख्या कमी होतानाच मृत्यू संख्‍या कमी होण्याची शक्यता आहे.

2,40,490 लस शिल्लक
2,40,490 कोरोना प्रतिबंधक लसीचे डोस अद्याप शिल्लक आहेत. त्यामुळे 45 वर्षांवरील नागरिकानी मोठ्या प्रमाणात पुढे येऊन लस घ्यावी, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. आज दिवसभरामध्ये 1700 लसीकरण झाले. त्यामध्ये 1308 लोकांनी पहिला डोस, तर 392 लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला. गोव्यासाठी कोविशील्ड ही सीरम इन्स्टिट्यूट पुणेची लस उपलब्ध झाली असून  6,31,720 लसीचे डोस गोव्यासाठी उपलब्ध झाले होते. त्यातील आत्तापर्यंत3,85,057 लसी 45 वर्षांवरील लोकांना देण्यात आल्या आहेत.  त्यामध्ये 3 लाख 896 जणांनी पहिला डोस आणि 84161 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याकडे अद्याप 2,40,490 एवढे लसीचे डोस उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com