गोवा विधानसभा: कोळसा खाण आणि म्हादई नदी प्रश्नावरून विरोधी नेते आक्रमक

गोवा विधानसभा: कोळसा खाण आणि म्हादई नदी प्रश्नावरून विरोधी नेते आक्रमक
Goa Assembly Opposition leaders have taken an aggressive stance on the issue of coal mining and the Mhadai River

पणजी: उत्तराखंड राज्यात गोवा सरकारला देण्यात आलेली कोळसा खाण आणि म्हादई नदीचे पाणी कर्नाटकाने पळवल्या प्रकरणीचा प्रश्न असे दोन प्रश्न आज विधानसभेत चर्चेला न घेतल्या वरून विरोधी आमदारांनी सभापतींच्या समोरील हौद्यात धाव घेतली. यामुळे सभापती राजेश पाटणेकर यांना विधानसभेचे कामकाज 15 मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर सभापती ने आत प्रश्नोत्तराचा तास पुकारला.त्यानंतर उद्योगमंत्री विश्वजीत राणे आणि जलसंपदामंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्स यांनी प्रश्न पुढे ढकलत असल्याचे निवेदन विधानसभेत केले. याला आक्षेप घेत पर्वरीचे आमदार रोहन खंवटे आणि फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई त्याने कोणत्या नियमांतर्गत उत्तर दिलेले प्रश्न पुढे ढकलता येतात अशी विचारणा केली.

मडकई चे आमदार सुदीन ढवळीकर यांनी उत्तर चूक असेल तरच प्रश्न पुढे ढकलता येतात असे स्पष्ट केले.याच दरम्यान सभापतींनी पुढील प्रश्न पुकारल्याने विरोधी आमदार आक्रमक झाले त्यांनी या प्रश्नांवर चर्चा करण्याचा आग्रह धरला. मात्र सभापतींनी तो मान्य न केल्यामुळे रोहन खंवटे व विजय सरदेसाई यांनी सभापती समोरील जागेत पहिल्यांदा धाव घेतली‌. यानंतर विरोधी आमदार सहभागी झाले. यामुळे सभापतींनी पंधरा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com