भाजपने आदिवासींचा वापर राजकारणासाठी आणि मते मिळवण्यासाठी केला

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 11 मार्च 2021

गोवा प्रदेश आदिवासी काँग्रेस समितीचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज दिली.

पणजी: गोमंतक गौड समाजाचे उपाध्यक्ष व नावेली गावचे पंच सूर्यकांत पुरस गावडे यांची आज गोवा प्रदेश आदिवासी काँग्रेस समितीचे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज दिली. त्यांना त्यांना नियुक्तीचे पत्र चोडणकर यांनी आज सुपूर्द केले.

गोवा फाॅरवर्डच्या कार्यकर्त्याला कुख्यात गुंड अन्वर शेखकडून धमकी 

यावेळी पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी भाजपवर टीका करताना म्हणाले की भाजपने फक्त आदिवासींचा वापर राजकारणासाठी तसेच मते मिळवण्यासाठी केला. आदिवासींचे प्रश्न ते धसास लावू शकले नाही. भाजपचा उद्देश आदिवासी लोकांचे प्रश्न सोडविण्याचा नव्हता. अनुसूचित जमातीच्या लोकांचे असंख्य प्रश्न आहेत. नवनिर्वाचित समन्वयक सूर्यकांत गावडे यांचा या आदिवासी लोकांशी जवळचा संबंध आहे त्यामुळे ते समाजाचे नेतृत्व योग्य प्रकारे करून त्यांचे प्रश्न धसास लावतील असे मत चोडणकर यांनी व्यक्त केले.

महाशिवरात्री 2021: गोव्यातील देवस्थानांमध्ये अशा पद्धतीने साजरी होणार महाशिवरात्री 

संबंधित बातम्या