GOA COVID-19 गोयेंकरांनो आता आणखी काळजी घ्या आणि विनाकारण घराबाहेर पडू नका

दैनिक गोमंतक
गुरुवार, 6 मे 2021

राज्यात भीतीचे वातावरण पण गोवा सरकारचे हे निर्बंध कुचकामी ठरले आहेत.

पणजी:  गोव्यात कोविडची (Covid 19) लागण झाल्यामुळे मृत्यू पावणाऱ्यांची साखळी थांबवण्याचे नाव घेत नाही. कालपासून रुग्ण मृत्यूचे प्रमाण घटण्यास सुरवात होईल, असे वाटत असतानाच काल 71 जणांनी कोविडमुळे प्राण गमावले. गेल्या पाच दिवसात 275 जणांनी कोविड कारणाने आपले प्राण गमावले आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (Goa Medical College) प्राणवायूची समस्या दूर केली गेली असतानाही मृत्यूची संख्या कमी होत नसल्याचे पाहून सरकारी यंत्रणा हादरली आहे. गोमेकॉच्या (Gomaco) अतिविशिष्ट उपचार विभाग इमारतीच्या दोन मजल्यांचा वापर कोविड इस्पितळ (Covid Hospital) म्हणून आजपासून सुरू केला असला तरी येत्या काही दिवसांत रुग्णांना खाटा कामी पडू शकतील अशा भयावह वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. राज्यात (GOA) भीतीचे वातावरण पण गोवा सरकारचे हे निर्बंध कुचकामी ठरले आहेत. त्यामुळे एकूणच आता सरकारला वरवरचा मुलामा बंद करून कोरोना नियंत्रणासाठी गंभीरपणे कोरोनावरच गंभीर शस्त्रक्रिया करण्याची गरज निर्माण झाली आहे. (GOA COVID19 Goenkars be careful now and dont go out for no reason)

आरोग्य खात्याने आज दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरामध्ये 6769 कोरोना सॅम्पलची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 3496 व्यक्ती कोरोना बाधित सापडल्या. ही कोरोना बाधितांची टक्केवारी राष्ट्रीय पातळीवर सर्व राज्यांमध्ये जास्त असून ती आज 51.35 टक्के एवढी आहे.यावरून गोव्यात कोरोना हाताबाहेर गेलाय ते स्पष्ट होत आहे. आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज कोरोनावर उपचार घेणाऱ्या 71 व्यक्ती दगावल्या. त्यातील 45 व्यक्ती या गोवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार घेत होत्या. तर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळांमध्ये उपचार घेणाऱ्या 20 व्यक्ती आज दगावल्या. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळांमध्ये दोन व्यक्ती, चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये एक व्यक्ती, कुडचडे आरोग्य केंद्रात एक व मडगाव (Madgaon) येथील हॉस्पिसियो इस्पितळांमध्ये एक व्यक्ती कोरोनामुळे आज मरण पावली. आज 71 बळी गेल्यामुळे आत्तापर्यंत राज्यामध्ये कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 1443 एवढी झाली असून आजच्या दिवशी सक्रिय कोरोना बाधितांची संख्या 27,964 एवढी झाली आहे. आज दिवसभरामध्ये 2192 एवढे व्यक्त कोरोनातून बरे झाले आहेत. एका दिवसांत दोन हजार व्यक्ती बरे होण्याचा प्रसंगही आज पहिल्यांदाच घडला आहे.

GOA COVID-19: २१ मुद्यांची सरकारला सूचना करून काहीही साध्य होणार नाही

गृह विलगीकरणावर पालिका, पंचायतीची नजर

कोविडची लागण झालेल्या आणि गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाने घराबाहेर पडणे योग्य नव्हे. त्यामुळे तो रुग्ण गृह विलगीकरणात राहतो, की नाही. याकडे आता पालिका व पंचायतीला लक्ष द्यावे लागणार आहे. तसा आदेश जारी करण्यात आला आहे. कोविडची लागण होऊनही अनेकजण बिनधास्तपणे घराबाहेर पडत असतात. यंदा राष्ट्रीय पातळीवरच हातावर शिक्का मारणे बंद केल्यामुळे कोण रुग्ण आहे व कोण नाही, हे समजण्याचा कोणताही मार्ग सध्या उपलब्ध नाही. यावर उपाय करण्यासाठी आता पालिका व पंचायतींना गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांची यादी स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध केली जाणार आहे. पंचांनी रुग्ण घरातच राहतात की नाही हे पाहतानाच त्यांना आवश्यक ते साहित्य मिळेल याची व्यवस्थाही करावी असे महसूल सचिव संजय कुमार (Sanjay Kumar) यांनी आज जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे. 

डॉक्टरांच्या चोवीस तास  उपस्थितीत कोविड भरतीपूर्व हॉस्पिटल सुरू

दक्षिण गोवा वकिलांची उच्च न्यायालयात धाव
कोविड -19 संकट हाताळण्यात गोवा सरकारला (Goa Government) आलेल्या अपयशा संदर्भात दक्षिण गोवा वकील संघटनेने उच्च न्यायालयात धाव घेतलेली असून न्यायालयाने राज्य सरकारला आवश्यक ते निर्देश द्यावेत, अशी विनंती केली आहे. रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन (Oxygen) पुरवठा व्हावा, आवश्‍यक औषधांचा पुरवठा करण्याची मागणी केली गेली आहे. कोरोनाविरोधी लसीचा पुरवठा व्हावा, डॉक्टर व वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करावी, अशी मागणीही केली गेली आहे.

कोविड योद्धा
राज्य सरकारने आज पत्रकारांना कोविड योद्धा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र सरकारचे कर्मचारी, दूरसंचार कर्तव्यावरील कर्मचारी, बॅंक कर्मचारी, सरकारी महामंडळ, स्वायत्त संस्थातील कर्मचारी, विशेष मुलांसाठीच्या संस्थांतील कर्मचाऱ्यांनाही हा दर्जा मिळणार आहे. यामुळे या वर्गवारीतील व्यक्तींना 45 वर्षे न होताही कोविड प्रतिबंधक लस (Covid Vaccine) घेता येणार आहे.

संबंधित बातम्या