लॉकडाऊन वाढविण्याबाबत गोवा सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

टाळेबंदीच्या कालावधीत अद्याप वाढ केलेली नाही ती सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत लागू आहे असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाला करावा लागला आहे.

पणजी: राज्य सरकारने सरकारी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची 50 टक्के उपस्थिती आणि तीन पाळ्यांमध्ये सरकारी कार्यालयाचे काम चालवायचे आदी मार्गदर्शक तत्त्वांना 15 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यापूर्वी काढलेल्या आदेशानुसार 30 एप्रिल पर्यंत ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होती. आता सर्वसाधारण प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार हे सर्व निर्बंध सरकारी कार्यालयांसाठी 15 मेपर्यंत लागू असतील असे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी 1 लाखाहून अधिक डोस उपलब्ध:  डॉ. प्रमोद सावंत 

सरकारच्या या परिपत्रकामुळे मात्र मोठा घोळ आज राज्यभरात झालेला दिसून आला. या परिपत्रकाचा अर्थ म्हणजे राज्य सरकारने गोव्यातील टाळेबंदी च्या कालावधीत 15 मेपर्यंत वाढ केली आहे असा समज अनेकांनी करून घेतला. मागचा पुढचा विचार न करता अनेक आणि त्याबाबतच्या ब्रेकिंग न्यूज ही दिल्या. अखेर टाळेबंदीच्या कालावधीत अद्याप वाढ केलेली नाही ती सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत लागू आहे असा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाला करावा लागला आहे. दरम्यान भारतीय वैद्यकीय संघटनेने कोविड प्रसार रोखण्यासाठी पंधरा दिवसांची टाळेबंदी सलग लागू केली जावी अशी मागणी सरकारकडे केली आहे.

पेडणे तालुक्यात आजपासून सहा दिवस वीजपुरवठा खंडित 

 

संबंधित बातम्या